बॉम्बे हलवा/बदामी हलवा/कॉर्नफ्लोर हलवा: बॉम्बे हलवा/बदामी हलवा/कॉर्नफ्लोर हलवा ही मिठाई आपण दिवाळी फराळासाठी बनवु शकतो. बॉम्बे हलवा किंवा बदामी हलवा हा कॉर्नफ्लोर व साखर ह्या पासून बनवला आहे तसेच हा हलवा कमी वेळात, झटपट व चवीस्ट बनतो. बॉम्बे हलवा छान पारदर्शक दिसतो. हलवा शिजवताना फार घट्ट शिजवू नये.
The Marathi language version of the same Halwa Recipe can be seen here – Famous Bombay Badam Halwa
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: २० वड्या
साहित्य: मिश्रणासाठी:
१ कप कॉर्नफ्लोर
३ कप पाणी
साखरेचा पाक बनवण्यासाठी:
२ १/२ कप साखर
२ कप पाणी
हलवा बनवण्यासाठी:
१/२ टे स्पून लिंबूरस
४-५ थेंब पिवळा किंवा केशरी रंग
१०-१५ काजू (तुकडे करून)
१ टी स्पून वेलचीपूड
कृती: एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोर व पाणी मिक्स करून घ्या.
साखरेचा पाक करण्यासाठी: एका कढईमधे साखर व पाणी मिक्स करून मध्यम विस्तवावर ५-७ मिनिट हलवत ठेवा.
हलवा बनवण्यासाठी: मग त्यामध्ये कॉर्नफ्लोरचे मिश्रण घालून मिक्स करून घट्ट होई परंत हलवत ठेवा. मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये लिंबूरस, पिवळा किंवा ऑरेज रंग, वेलचीपूड व थोडे काजू तुकडे घालून मिक्स करून २-३ मिनिट मंद विस्तवावर ठेवा.
एक स्टीलच्या प्लेटला तूप लाऊन त्यामध्ये मिश्रण ओतून एक सारखे करून वरतून काजूचे तुकडे घालून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर चौकोनी तुकडे करून घ्या.