कॉर्न कचोरी: आजकाल वर्षभर आपल्याला बाजारामध्ये स्वीट कॉर्न (मक्याची कणसे) उपल्ब्ध होतात. आता परंत आपण मक्याच्या कणसाचे बरेच पदार्थ बनवले आहेत. मक्याच्या कणसाची कचोरी छान स्वादीस्ट लागते. कॉर्न कचोरी बनवतांना ताजी थोडी निब्बर कणसे घेतली आहेत. ह्यालाच हिंदी मध्ये भुट्टेकी कचोरी असे सुद्धा म्हणतात. अश्या प्रकारची कचोरी आपण कीटी पार्टीला, लहान मुलांच्या वाढदिवसाला पार्टीला, नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर सुद्धा बनवु शकतो.
The English language version of this Kachori recipe can be seen here – Tasty Bhutte Ki Kachori
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १२-१५ बनतात
साहित्य:
सारणासाठी:
२ कप कणसाचा कीस
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून दालचीनी-लवंग पावडर
१ टी स्पून लिंबूरस
मीठ व साखर चवीने
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून हिंग
आवरणासाठी:
१ कप मैदा
१/२ कप बेसन
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
तेल कचोरी तळण्यासाठी
कृती: आवरणासाठी: मैदा, बेसन, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, गरम तेल (मोहन) घालून मिक्स करून थोडेसे पाणी घालून घट्ट पीठ मळून घेऊन ३० मिनिट बाजूला झाकून ठेवा.
सारणासाठी: मक्याची कणस किसून घ्या. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये हळद, हिंग, चिरलेली हिरवी मिरची, किसलेला मक्याचा कीस, लाल मिरची पावडर. दालचीनी-लवंग पावडर, मीठ घालून मिक्स करून थोडे कोरडे होई परंत शिजवून घ्या. मग त्यामध्ये लिंबूरस व साखर घालून मिक्स करून घेऊन बनवलेले सारण बाजूला ठेवा.
कचोरी बनवण्यासाठी: मळलेल्या पीठाचे एक सारखे १५ गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन पुरी सारखा लाटून त्यामध्ये एक चमचा सारण भरून पुरी बंद करा. अश्या प्रकारे सर्व कचोरी बनवून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कचोऱ्या ब्राऊन रंगावर तळून घ्या.
गरम गरम कचोऱ्या टोमाटो सॉस बरोबर किंवा पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करा.