कश्मीरी दम आलू: कश्मीरी दम आलू ही एक काश्मीर प्रांतातील एक पारंपारिक व सुप्रसिद्ध डीश आहे. ही डीश बनवतांना व्हाईट व ब्राऊन ग्रेव्ही वापरली आहे.
The English language version of the same vegetable preparation can be seen here – Authentic Kashmiri Dum Aloo
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी:
साहित्य:
८ छोटे बटाटे
तेल बटाटे तळण्यासाठी
१ टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर
२ टे स्पून फ्रेश क्रीम
मीठ चवीने
सारणासाठी:
२ टे स्पून खवा
१ टी स्पून आले-लसूण पेस्ट
१/४ टी स्पून मिरे पावडर
१/४ टे स्पून लिंबूरस
१/४ टी स्पून साखर
१ टे स्पून काजू-बदाम जाडसर (वाटून)
३ टे स्पून मैदा,
१/२ कप पाणी
व्हाईट ग्रेव्ही:
१/४ कप व्हाईट ग्रेव्ही
( १/२ टी स्पून तेल
१० काजू
२ टे स्पून मगज
१/४ तमलपत्र)
ब्राऊन ग्रेव्ही:
३/४ कप ब्राऊन ग्रेव्ही
(४ मोठे कांदे
१/२ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१/२ टी स्पून धने-जिरे पावडर
१/२ तमलपत्र
१/२ टी स्पून गरम मसाला
१/४ टी स्पून हळद
२ टे स्पून तेल)
कृती:
प्रथम बटाटे सोलून घेऊन धुऊन घ्या. मग वरचा भाग कापून मोठ्या भागातील बटाट्याच्या आतून थोडा पोकळ करा म्हणजे आपल्याला त्यामध्ये सारण भरता येईल.
मग खवा, आले-लसूण पेस्ट, मिरे पावडर, लिंबूरस, साखर, काजू-बदाम पेस्ट मिक्स करून घ्या. हे सारण पोकळ केलेल्या बटाट्याच्या भागात भरून बटाट्याच्या वरचा भाग लाऊन बटाटा बंद करून घ्या.
कढईमधे तेल गरम करायला ठेवा. एका छोट्या बाऊलमध्ये ३ टे स्पून मैदा व पाणी मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. एक एक बटाटा घेऊन मैद्याच्या पेस्टमध्ये डूबवून गरम तेलामध्ये गुलाबी रंगावर तळून घ्या.
व्हाईट ग्रेव्ही करीता: काजू, मगज, तमलपत्र व दोन कप पाणी १५ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये हा मसाला थोडा कोरडा होई परंत परतून घ्या.
ब्राऊन ग्रेव्ही: कांदा च्र्रून घ्या. कढईमधे १ टे स्पून तेल गरम करून कांदा ब्राऊन होई परंत परतून घ्या. मग बारीक वाटून घ्या. परत कढईमधे १ टे स्पून तेल गरम करून कांदा, आले-लसूण पेस्ट, धने-जिरे पावडर, गरम मसाला, घालून मंद विस्तवावर परतून घेऊन शेवटी लाल मिरची पावडर, हळद घालून मिक्स करा.
एका पसरट जाड बुडाच्या भांड्यात ब्राऊन व व्हाईट ग्रेव्ही,२ कप पाणी, मीठ घालून ५ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. मग त्यामध्ये फ्रेश क्रीम, तळलेले बटाटे घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर उकळी आली की विस्तव बंद करा. सर्व्ह करताना कोथबीर घालून सजवा.
गरम गरम कश्मीरी दम आलू पराठ्या बरोबर सर्व्ह करा.