इटालीयन व्हेजीटेबल सूप: इटालीयन व्हेजीटेबल सूप बनवण्यासाठी खूप सोपे आहे. ह्या मध्ये प्रथम व्हेजीटेबल स्टॉक बनवून घेतला आहे. हे सूप अगदी पौस्टिक आहे. थंडीच्या दिवसात किंवा इतर सीझनमध्ये सुद्धा बनवायला चांगले आहे. ह्यामध्ये सर्व भाज्या व पास्ता आहे त्यामुळे पोटपण भरते.
रात्रीच्या जेवणात इटालीयन व्हेजीटेबल सूप, गार्लिक ब्रेड बरोबर सर्व्ह करावे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
६ कप व्हेजीटेबल स्टॉक
१ मध्यम आकाराचा बटाटा
१ मध्यम आकाराचा कांदा
१ छोटा टोमाटो
१ मध्यम आकाराचे गाजर
१ सेलेरी
१/२ कप हिरवे मटार
१ तमालपत्र
१ टी स्पून इटालीयन मसाला
१/८ टी स्पून मिरे पावडर
१/२ कप पास्ता (शिजवून)
१ कप टोमाटो (चौकोनी तुकडे)
मीठ चवीने
कृती:
प्रथम व्हेजीटेबल स्टॉक बनवून घ्या. बटाटा सोलून चौकोनी तुकडे करून घ्या, गाजर व कांदा सोलून चौकोनी तुकडे करून घ्या. पास्ता शिजवून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात व्हेजीटेबल स्टॉक, बटाटा, गाजर, मटार, कांदा,सेलरी, तमालपत्र घालून १५ मिनिट मंद विस्तवावर भाज्या शिजवून घ्या. भाज्या शिजल्यावर त्यामध्ये पास्ता, टोमाटो, इटालीयन मसाला, मीठ घालून एक चांगली उकळी आणा.
इटालीयन व्हेजीटेबल सूप गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करताना तमालपत्र काढून घ्या.