चॉकलेट तिळाचे लाडू: चॉकलेट तिळाचे लाडू हे मकर संक्रांतीला सुद्धा बनवायला छान आहेत. तीळ हे थंडीच्या सीझनमध्ये मुद्दामून खातात. मुलांसाठी हे लाडू हितावह आहेत.चॉकलेट हे आरोग्यासाठी चांगले आहे. हे लाडू चवीला छान लागतात तसेच दिसायला आकर्षक दिसतात.
The English language version of the same Ladoo recipe can be seen here – Chocolate Sesame Seeds Ladoo
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: २५-३० लाडू
साहित्य:
२५० ग्राम डार्क चॉकलेट कंपाऊंड,
१ कप तीळ
१/४ कप डेसिकेटेड कोकनट
कृती:
तीळ थोडे भाजून घ्या. डार्क चॉकलेट कंपाऊंडचे बारीक तुकडे करून घेऊन डबल बोईल पद्धतीने विरघळवून घ्या. चॉकलेट विरघळलेकी बाजूला ४-५ मिनिट थंड करायला ठेवा. मग त्यामध्ये ३/४ कप भाजलेले तीळ व डेसिकेटेड कोकनट घालून मिक्स करून घ्या. एका बाऊलमध्ये उरलेले तीळ व डेसिकेटेड कोकनट मिक्स करून ठेवा.
तयार झालेल्या मिश्रणाचे एक सारखे छोटे लाडू बनवून बाउलमधील तिळामध्ये घोळून बाजूला ठेवा. अश्या प्रकारे सर्व लाडू बनवून घ्या. चॉकलेट-तीळ लाडू तयार झालेकी फ्रीजमध्ये ५ मिनिट ठेवा.