इटालीयन चीज मँक्रोनी बॉल्स: ही एक छान स्टार्टर म्हणून किंवा नाश्त्याला बनवायला छान डीश आहे. तसेच लहान मुलांच्या वाढदिवसाला किंवा घरी छोट्या पार्टीला बनवायला छान आहे. मँक्रोनी तर सर्वाना आवडते त्याचे बॉल्स बनवतांना पांढरा सॉस बनवून त्यामध्ये हे बॉल्स बनवले आहेत.
An English language version of a similar recipe for making Italian Cheese Macaroni Balls can be seen here – Recipe for Cheese and Macaroni Balls
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जनासाठी
साहित्य:
२ टे स्पून मैदा
१०० ग्राम मँक्रोनी
४ टे स्पून चीज
१ कप दुध
२ टे स्पून बटर
१ टी स्पून मिरीपूड
१ टी स्पून ऑरगॅनो
१ टी स्पून चिली फ्लेक्स
२ ब्रेड स्लाईस (क्रम बनवायला)
१ कप कॉर्नफ्लोर
मीठ चवीने
तेल चीज मँक्रोनी बॉल्स तळण्यासाठी
कृती:
मध्यम आकाराच्या भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये थोडे मीठ घालून मँक्रोनी घालून शिजवून घ्या.
एक नॉन स्टिक कढईमधे बटर गरम करून त्यामध्ये मैदा घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये दुघ घालून मिक्स करून घेऊन एक सारखे हलवत रहा म्हणजे गुठळी होणार नाही. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ, ऑरगॅनो, चिली फ्लेक्स,मिरी पावडर व १ टे स्पून चीज घालून मिक्स करून घेऊन मिश्रण थोडेसे घट्ट होई परंत मंद विस्तवावर ठेवा. मग तयार झालेला सॉस एक बाऊलमध्ये काढून थंड करायला ठेवा.
सॉस थंड झाल्यावर एक काचेच्या बाऊलमध्ये सॉस व शिजवलेली मँक्रोनी, ३ टे स्पून चीज घालून मिश्रण एक सारखे मळून त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेऊन बाजूला ठेवा.
एका भांड्यात कॉर्नफ्लोरमध्ये पाणी मिक्स करून थोडासे घट्टसर मिश्रण बनवून घ्या. एका प्लेट मध्ये ब्रेडचे ब्रेडक्रम बनवून घ्या. मग एक बॉल घेऊन कॉर्नफ्लोरच्या मिश्रणात घोळून मग ब्रेड क्रममध्ये घोळून घेऊन बाजूला ठेवा. अश्या प्रकारे सर्व बॉल अश्याच पद्धतीने बनवून बाजूला ठेवा.
एक कढईमध्ये तेल गरम करून घेऊन त्यामध्ये चीज मँक्रोनी बॉल्स तळून घ्या.
गरम गरम चीज मँक्रोनी बॉल्स टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.