टूटी फ्रूटी आईसक्रिम: टूटी फ्रूटी आईसक्रिम हे चवीस्ट लागते. तसेच दिसायला पण सुंदर दिसते. हे आईसक्रिम बनवायला सोपे आहे. ह्यामध्ये कस्टर्ड पावडर, केशरी रंग, टूटी फ्रूटी, व व्हनीला इसेन्स वापरले आहे. लहान मुलांना टूटी फ्रूटी आईसक्रिम खूप आवडते.
The English language version of this recipe can be seen here – Tutti Frutti Ice Cream
टूटी फ्रूटी आईसक्रिम: टूटी फ्रूटी आईसक्रिम हे चवीस्ट लागते. तसेच दिसायला पण सुंदर दिसते. हे आईसक्रिम बनवायला सोपे आहे. ह्यामध्ये कस्टर्ड पावडर, केशरी रंग, टूटी फ्रूटी, व व्हनीला इसेन्स वापरले आहे. लहान मुलांना टूटी फ्रूटी आईसक्रिम खूप आवडते.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
सेट करण्यासाठी वेळ ४-५ तास
वाढणी : ४-५ जणांना
साहित्य:
१ लिटर दुध (म्हशीचे)
१/२ कप साखर
१ १/२ टे स्पून कस्टर्ड पावडर
१/२ कप फ्रेश क्रीम
२ थेंब केशरी रंग (खाण्याचा)
२ टे स्पून टूटी फ्रूटी
३-४ थेंब व्हनीला ईसेन्स किंवा फ्रुट ईसेन्स
कृती:
एका जाड बुडाच्या भांड्यात दुध व साखर मिक्स करून गरम करायला ठेवा. दुध मंद विस्तवावर १५-२० मिनिट ठेवा. म्हणजे ते थोडे घट्ट होईल. मग ते थंड करायला ठेवा. दुधाचे दोन भाग करून घ्या. एका भाग बाजूला ठेवा. व दुसऱ्या भागात कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. कस्टर्ड घट्ट होत आले की विस्तव बंद करून कस्टर्ड थंड करायला ठेवा.
मिक्सरच्या जुसर च्या भांड्यात आटवलेले दुध, कस्टर्ड , केशरी रंग, फ्रेश क्रीम, व्हनीला ईसेन्स घालून ब्लेंड करून घ्या. नंतर मिश्रण जस्ताच्या भांड्यात ओतून वरतून टूटी फ्रूटी घालून मिक्स करून डीप फ्रीझर मध्ये ४-५ तास आईसक्रिम सेट करायला ठेवा.
रतांना वरतून टूटी फ्रूटीने सजवून सर्व्ह करा.