पनीर स्टफ मश्रूम: पनीर स्टफ मश्रूम ही एक स्टारटर म्हणून किंवा जेवणात सुद्धा बनवता येते. पनीर स्टफ मश्रूम ही एक छान पौस्टिक डीश आहे. ह्या मध्ये गाजर, शिमला मिर्च, बीन्स व मश्रूम वापरले आहे व ते मश्रूम मध्ये भरून बेक किंवा नॉन स्टिक भांड्यात बेक केले आहेत.
The English language version of this recipe can be seen here – Healthy and Nutritious Paneer Stuffed Mushrooms
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १० बनतात
साहित्य:
१० मश्रूम
५-६ बीन्स
१ छोटे गाजर
१ छोटी शिमला मिर्च
१/४ कप पनीर (बारीक चिरून)
१ छोटा कांदा
४-५ लसूण पाकळ्या
३-४ हिरव्या मिरच्या
१/२ टी स्पून गरम मसाला
२ टी स्पून चाट मसाला
मीठ चवीने
२ टे स्पून बटर
१ चीज क्यूब (किसून)
कृती:
मश्रूम धुऊन त्याची देठ काढून घ्या. मश्रूम देठ, बीन्स, गाजर, शिमला मिर्च, कांदा, लसून व हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.
एका कढईमधे १ टे स्पून बटर गरम करून त्यामध्ये लसून, कांदा एक मिनिट परतून घेवून त्यामध्ये हिरवी मिरची, बीन्स, गाजर, शिमला मिर्च घालून भाज्या परतून घ्या. मग त्यामध्ये पनीर, मीठ व गरम मसाला चवीने घालून मिक्स करून घेवून एक मिनिट परतून घ्या. विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
मश्रूम मध्ये थोडे थोडे सारण भरून वरतून किसलेले चीज घालून चाट मसालाने सजवा. अश्या प्रकारे सर्व मश्रूम भरून घ्या.
नॉन स्टिक भांडे गरम करून भरलेले मश्रूम त्या भांड्यात मांडून ठेवा. बाजूनी थोडे-थोडे बटर सोडा. मंद विस्तवावर छान खरपूस भाजून घ्या.
गरम गरम स्टफ मश्रूम सर्व्ह करा.