सोया चंक करी: सोया चंक करी ही एक टेस्टी करी आहे. आपण मुख्य जेवणात बनवू शकतो. सोयाबीन मध्ये भरपूर प्रोटीन, विटामीन व खनिजे आहेत. सोयाबीन हे आपल्या हृदयासाठी हितकारक आहेत तसेच उच्च रक्तदाब असेलल्या व्यक्तीना हे फायदेशीर आहे. ज्यांना नॉनव्हेज चालत नाही त्यांना सोयाबीनचे पदार्थ अगदी फायदेमंद आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ३-४ जणासाठी
साहित्य:
१ कप सोया चंक
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ छोटा टोमाटो (चिरून)
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१/४ कप पुदिना पाने (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून तेल
ग्रेवी करीता मसाला:
२ टी स्पून खसखस
१ टी स्पून बडीशेप
१/४ कप खोबरे (खोवून)
फोडणी करीता:
१ टी स्पून तेल
१ तमलपत्र
१/२ स्टार फुल
२-३ लवंग
१ टी स्पून जिरे
१ दालचीनी तुकडा
मँरीनेट करण्यासाठी:
१ टी स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
१ टी स्पून लाल ,मिरची पावडर
१/२ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
१ टी स्पून लिंबूरस
कृती: प्रथम ३-४ ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये सोया चंक घालून पाच मिनिट उकडून घ्या. मग पाणी काढून घेवून थोडे थंड करायला ठेवून सोयाचंक मधील पाणी थोडे दाबून काढा.
एका बाउलमध्ये शिजवलेले सोया चंक, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ व लिंबू घालून मिक्स करून घेवून १०-१५ मिनिट झाकून बाजूला ठेवा.
तवा गरम करून खसखस थोडी गरम करा, मग बडीशेप, खसखस व ओला नारळ थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
कांदा, टोमाटो, कोथंबीर, पुदिना बारीक चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमलपत्र, स्टार फुल, लवंग, दालचीनी, जिरे घालून चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला टोमाटो घालून थोडे परतून २ टे स्पून पाणी घालून थोडे परत परतून घ्या. टोमाटो शिजला की त्यामध्ये मँरीनेट केलेले सोया चंक, चिरलेली कोथंबीर, पुदिना, गरम मसाला, मीठ , लाल मिरची पावडर घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला मसाला व ३/४ कप पाणी घालून ५ मिनिट चांगले शिजू द्या.
गरम गरम सोया चंक करी पराठा बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.