सकाळ उद्योग समूहाची पाककला स्पर्धा कोलोनेड को-ऑप. हौसिंग सोसायटी, खराडी, पुणे येथे दिनांक १० जून २०१८ रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित केली होती. कोलोनेड सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रांतातील रहीवाशी राहतात तरी पण स्पर्धेसाठी खूप छान प्रतिसाद मिळाला.
पाककला स्पर्धेचे नियोजन श्री जाधव, श्री वाघ, श्री गाडेकर, श्री गावडे व त्याचे सहकारी ह्यांनी खूप छान केले होते. तसेच श्री शिंदे यांनी anchoring चे काम उत्कृष्ट केले होते.
कोलोनेड को-ऑप. हौसिंग सोसायटी, खराडी, पुणे येथे पाक कला स्पर्धेमध्ये जवळपास ३५ महिलांनी व ७ लहान मुलांनी भाग घेतला होता. महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ, मेंगलोरमधील, गुजराती, पंजाबी, मारवाडी पद्धतीचे बरेच पदार्थ बनवले होते.
कोलोनेड को-ऑप. हौसिंग सोसायटी पाककला स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे लिटील शेफ यांनी सुद्धा वेगवेगळ्या छान डिशेश बनवून आणल्या होत्या.
सकाळ उद्योग समूहानी महिलांच्या बरोबर लहान मुलांना सुद्धा प्रशस्ती पत्रक देऊन त्यांना सुद्धा बक्षीस दिली होती. ह्या स्पर्धेमध्ये खानदेशी प्लाटरला पहिले बक्षीस, दुसरे कोल्हापुरी प्लाटरला व तिसरे पनीर दोप्याजला व उतेजनार्थ आंबा बर्फी व चायनीज चिकनला मिळाले.
कोलोनेड को-ऑप. हौसिंग सोसायटी, खराडी, पुणे पाककला स्पर्धे साठी सुजाता नेरुरकर व खराडी विभागातील मासा मासा ह्या रेस्टॉरंटचे शेफ लोखंडे ह्यांना परीक्षणासाठी बोलावले होते. मासा मासा रेस्टॉरंटचे श्री शेट्टी यांनी स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकाना कुपन दिली व विजेत्यांना गिफ्ट व्हाऊचर दिली. एकंदरीत स्पर्धा खूप छान पार पडली.