कोळीवाडा चिकन ग्रेवी: कोळीवाडा चिकन ग्रेवी ही खूप स्वादिस्ट डीश आहे. आपण आता परंत आईकले असेल की कोळीवाडा फिश करी, कोलंबीची करी ह्या अगदी मसालेदार व चवीस्ट डीश आहेत. चिकन कोळीवाडा ग्रेवी बनवतांना कोळीवाडा मसाला वापरून ही डीश बनवली आहे. कोळीवाडा मसाला बनवतांना एकून सर्व गरम कच्चे मसाले वापरले आहेत.त्यामुळे ताज्या मसाल्याचा छान सुगंध येतो व चिकन टेस्टी बनते.
कोळीवाडा चिकन ग्रेवी गरम गरम भाता बरोबर किवा तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागते.
The English version of this Chicken Recipe can be seen here – Spicy Chicken Koliwada
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
४०० ग्राम चिकन
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ टे स्पून तेल
१ कप ओला नारळ (खोवून)
१ १/२ टी स्पून कश्मीरी लाल मिरची
१ टी स्पून गरम मसाला
२ टी स्पून कोळीवाडा मसाला
१/४ टी स्पून हळद मीठ चवीने
कोळीवाडा मसाला बनवण्यासाठी:
१ तमालपत्र
३-४ सुक्या लाल मिरच्या
१ टी स्पून खसखस
१ टी स्पून बडीशेप
१ टी स्पून पांढरे तीळ
३-४ लवंग
१ मसाला वेलची
४ हिरवे वेलदोडे
१” दालचीनी तुकडा
१ चक्रफुल
१ छोटा तुकडा जायफळ
१ टी स्पून जिरे
४-५ काळे मिरे
१ टी स्पून धने
कृती: प्रथम चिकन साफ करून धुवून बाजूला ठेवा. कांदा, कोथंबीर चिरून बाजूला ठेवा.ओला नारळ मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्या.
कोळीवाडा मसाला बनवण्यासाठी सर्व जीनस सुके मंद विस्तवावर थोडेसे भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून जिरे व कांदा गुलाबी रंगावर परतून घेवून आले-लसून पेस्ट घालून परत थोडे परतून घ्या. मग कश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, मीठ चिकनचे तुकडे घालून थोडेसे परतून घेवून कढईवर झाकण ठेवून ५-७ मिनिट मंद विस्तवावर चिकन शिजवून घ्या.
कढई वरील झाकण काढून चिकनमध्ये गरम मसाला, कोळीवाडा मसाला, वाटलेला नारळ, २ कप पाणी घालून मिक्स करून परत कढईवर झाकण ठेवून १०-१५ मिनिट मंद विस्तवावर चिकन शिजवून घ्या.
गरम गरम कोळीवाडा चिकन ग्रेवी भाता बरोबर व तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करा.