मसूरच्या डाळीचे सूप: मसूरच्या डाळीचे सूप हे बहुगुणी आहे. गरम गरम मसूरच्या डाळीचे सूप घेतल्याने कफ, पिक्त, रक्त पिक्त व तसेच ताप आला असेलतर दूर होतो. ह्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. व मसूर हे शक्ती वर्धक व बहुगुणी आहे. मसूरच्या डाळीचे सूप बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप मसूर डाळ
१/२ टी स्पून हळद
३-४ लसून पाकळ्या (ठेचून)
१ छोटा कांदा (बारीक चिरून),
१ टी स्पून लिंबूरस
१ टी स्पून चिली सॉस
१ टे स्पून कांदा पात (चिरून)
मीठ व मिरी पावडर चवीने
कृती:
मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्या मग एका भांड्यात मसूर डाळ व ५-६ कप पाणी मिक्स करून ३० मिनिट झाकून ठेवा. मग प्रेशर कुकरमध्ये भिजवलेली डाळ, हळद, लसून व कांदा मिक्स करून २-३ शिट्या काढून घ्या. प्रेशर कुकर थंड झाल्यावर त्यामध्ये लिंबूरस, चिली सॉस, मीठ, मिरे पावडर घालून एक छान उकळी आणा.
गरम गरम मसूरच्या डाळीचे सूप सर्व्ह करा. सर्व्ह करताना कांदा पात बारीक चिरून घालून सजवून सर्व्ह करा.