Cauliflower Potato Soup Recipe in Marathi

Cauliflower Batata Soup
Cauliflower Potato Soup

कॉलीफ्लावर-पोटँटो सूप: कॉलीफ्लावर- पोटँटो सूप हे पौस्टिक तर आहेच कारण ह्या मध्ये आपल्या आरोग्यासाठी जी प्रोटीन, कॅल्श‌यिम, सोडीयम, पोटॅशियम, लोह. जीवनसत्व “ए” , “बी” व “सी” असते. तसेच मुले कॉलीफ्लावर खाण्याचा कंटाळा करतात त्यामुळे सूप बनवले तर त्यांना नक्की आवडेल.

बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी

साहित्य:
२५० ग्राम कॉलीफ्लावर
३ मध्यम आकाराचे बटाटे
१ मोठा कांदा (चिरून)
२ मध्यम आकाराची गाजर
४ कप व्हेजीटेबल स्टॉक
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून लसून (चिरून)
१ टी स्पून धने पावडर
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून जिरे पावडर
१ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
आवशकता भासल्यास अजून व्हेजीटेबल स्टॉक वापरणे.

Cauliflower Batata Soup
Cauliflower Potato Soup

कृती: कॉलीफ्लावर स्वच्छ धुवून त्याचे तुरे कापून घ्या. बटाटे सोलून धुवून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून, भाज्या बुडेल एव्ह्डे पाणी घालून १५-२० मंद विस्तवावर शिजवून घ्या.मग भाज्या थोड्या थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यामध्ये व्हेजीटेबल स्टॉक मिक्स करून कॉलीफ्लावर- पोटँटो सूप गरम करून घ्या.

गरम गरम कॉलीफ्लावर- पोटँटो सूप सर्व्ह करा. सर्व्ह करताना कोथंबीर घालून सजवा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.