स्वीट पोटँटो सूप: रताळ्याचे सूप अत्यंत पौस्टिक आहे कारण रताळ्यामध्ये आपल्या आरोग्या साठी लागणारे कॅल्शयिम, सोडीयम, पोटॅशियम, लोह. जीवनसत्व “ए” व “सी” असते. तसेच रताळे हे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी व थंड आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ टे स्पून बटर
४ मध्यम आकाराची रताळी
५-६ लसून पाकळ्या
१ छोटा कांदा
एक चिमुट लाल मिरची पावडर
१ कप व्हेजीटेबल स्टॉक
मीठ व मिरे पावडर चवीने
१ कप दुध
४ टी स्पून फ्रेश क्रीम
१/४ टी लाल मिरची पावडर सजावटी साठी
कृती: रताळी स्वच्छ धुवून, साले काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे कापून घ्या. चिकन स्टॉक बनवून घ्या. लसून सोलून चिरून घ्या.
एका कढईमधे बटर गरम करून त्यामध्ये चिरलेली रताळी, लसून, घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये कांदा, लाल मिरची पावडर, चिकन स्टॉक, मीठ, मिरे पावडर घालून मिश्रण ८-१० मिनिट मंद विस्तवावर शिजत ठेवा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. मग दुध मिक्स करून गरम करायला ठेवा. सूप गरम झालेकी सर्व्ह करताना फ्रेश क्रीम फेटून घाला व लाल मिरची पावडरने सजवा.
गरमागरम स्वीट पोटँटो सूप सर्व्ह करा.