मिंट टी: पुदिन्याची आपण चटणी बनवतो. तसेच त्याचा चहा पण चवीस्ट लागतो. हा चहा बनवताना पुदिना पाने, मिरे व काळे मीठ वापरले आहे.
पुदिन्यामध्ये विटामिन “ए” “बी” “सी” तसेच आयर्न, कैल्शियम हे अधिक प्रमाणात असते. पुदिना, मिरे व काळे मीठ वापरून बनवलेल्या चहाच्या सेवनाने पोट साफ होऊन, पोटातील रोग दूर होण्यास मदत होते.
पचनशक्ती सुधारते. चेहऱ्यावरील पिंपल ठीक होतात, आपली त्वचा थंड रहाते व उजळून येते. एलर्जी कमी होते. पचनशक्ती सुधारून वजन कमी होते. हा चहा खूप गुणकारी आहे, आपण पाहिजेतर ह्यामध्ये साखर व दुध वापरू शकतो पण मग तो नेहमी सारखा चहा होईल.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: २ कप
साहित्य: २ कप पाणी
१/२ टी स्पून मिरे (जाडसर कुटून)
१/२ टी स्पून काळे मीठ
१०-१२ पुदिना पाने
कृती: प्रथम पुदिना पाने स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात दोन ख पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये पुदिना पाने, मिरे, काळे मीठ घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर चहाला उकळी येऊ द्या.
मग एका काचेच्या ग्लासमध्ये चहा गाळून सर्व्ह करा.