खजुराचे पौष्टिक लाडू: खजुराचे लाडू हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. रोज सकाळी एक खजुराचा लाडू व कपभर दुध सेवन केल्यास आपल्या आरोग्याला अगदी फायदेशीर होईल.
खजूर हा अति पौस्टिक, वीर्यवर्धक, व बलवर्धक आहे. खजूर हृदयासाठी हितावह व शीतल, पण पचण्यास जड आहे. अशक्तपणा घालवण्यासाठी व वजन वाढवण्यासाठी खजूर दुधात उकळून खाल्यास खूप फायदा होतो. खजूर हा गरम नसून थंड आहे.
खजुरात जीवनसत्व “ए”, “बी” व “सी” भरपूर प्रमाणात आहे. तसेच लोह, कॅल्शियम तांबे आहे. खजुराच्या सेवनाने शरीरातील अवयवांचा चांगला विकास होतो. हृद्य, शरीर सुद्रुड बनते. पचनव्यवस्था मजबूत होऊन भूक लागते. व आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.
The English language version of the same Ladoo recipe can be seen here – Healthy and Nutritious Dates Ladoo
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: १० लाडू
साहित्य:
१ कप खजूर (बिया काढलेला) किंवा २० खजूर (बिया काढून)
१५ बदाम
१ टी स्पून खसखस
२ टे स्पून डेसिकेटेड कोकनट
१/२ टे स्पून तूप
कृती: प्रथम खजूरच्या बिया काढून मिक्सरमध्ये थोडा जाडसर वाटून घ्या. बदाम थोडे जाडसर वाटून घ्या.
एका कढईमधे खसखस व डेसिकेटेड कोकनट कोरडेच थोडेसे भाजून घेवून बाजूला काढून ठेवा. मग कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये खजूर घालून मंद विस्तवावर २-३ मिनिट परतून घेवून त्यामध्ये खसखस, डेसिकेटेड कोकनट व बदाम घालून मिक्स करून विस्तव बंद करून मिश्रण ४-५ मिनिट थंड करायला ठेवा.
मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचे छोटे-छोटे लाडू बनवून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.
खजूर लाडू बनवतांना तुम्हाला काजू, पिस्ता घालायचे असतील तरी घालू शकता.