पौस्टिक पराठा: पौस्टिक पराठा ह्या मध्ये पालक, मेथी, बटाटे वापरून पराठे बनवले आहेत. पौस्टिक पराठा आपण सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जनासाठी
साहित्य:
१/२ पालक गड्डी
१ कप मेथी पाने
३ मोठे बटाटे
७-८ लसूण पाकळ्या
७-८ हिरव्या मिरच्या
१/२” आले तुकडा
साखर व मीठ चवीने
१ टी स्पून लिंबूरस
२ टे स्पून बेसन
२ कप गव्हाचे पीठ
तांदूळ पिठी चवीने
तेल
कृती: पालक धुवून, चिरून उकळत्या पाण्यात घालावा. थंड झाल्यावर पाणी काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या. मेथी धुवून चिरून घ्या. बटाटे उकडून, सोलून गरम असताना किसून घ्या.
गव्हाच्या पिठीत, बेसन, १ टे स्पून तांदूळ पिठी, तेल,मीठ, साखर, आले-लसून, मिरची, वाटून वाटलेला पालक घालून पीठ घट्ट माळून घ्या.
एका कढईमध्ये १ टे स्पून तेल गरम करून आले=लसून-हिरवी मिरची वाटण घालून परतून चिरलेली मेथी घालून, उकडलेला बटाटा, मीठ साखर, लिंबूरस, घालून एक वाफ आणावी. मग सारण थंड करायला ठेवावे.
भिजवलेला पिठाचा एक गोळा घेवून लाटून त्यामध्ये थोडे सारण भरून गोळा बंद करून तांदळाच्या पिठीवर पराठा लाटून घ्या. पराठा भाजताना बाजूनी तेल सोडून खरपूस भाजून घ्या.
गरम गरम पौस्टिक पराठा सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावा.