देह्रोरी (Dehrori) : देहोरी ही एक स्वीट डीश आहे. ती आपण सणावारी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. देहोरी ही एक स्वीट डीश चवीस्ट व अगदी निराळी आहे. छत्तीसगढ़ मधील ही लोकप्रिय डीश आहे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जनासाठी
साहित्य:
२ कप तांदूळ
१ १/२ कप साखर
३/४ कप घट्ट दही
२ टे स्पून तूप (पातळ)
५-६ केसर काड्या
१/२ टी स्पून वेलचीपूड
१ १/२ टी स्पून लिंबूरस
तळण्यासाठी तूप
बदामाचे काप
गुलाब पाकळ्या सजावटीसाठी
कृती:
तांदूळ स्वच्छ धुवून ३-४ तास भिजवून ठेवावे. त्यातील पाणी निथळून टाकून कोरडे करावे. व कापडावर पसरवून वाळवावे. २-३ तासा नंतर मिक्सर मधून जाडसर रवा असतो इतपत पावडर करून घ्या.
तांदळाच्या रव्यात दही व वितळलेले तूप मिसळून घट्टसर मिश्रण बनवून रात्रभर झाकून ठेवून फर्मट होऊ द्यावे.
पाक बनवण्यासाठी साखरेत १ कप पाणी घालून १ तारी पाक करावा. त्यात केसर काड्या, वेलचीपूड , व लिंबूरस मिसळावा.
कढईमधे तूप गरम करून त्यात तांदळाच्या पीठाचे छोटे-छोटे गोळे सोडावे व तांबूस रंगावर खमंग तळावे. टिशू पेपरवर तळलेले गोळे पसरवून जास्तीचे तूप काढून टाकावे. तळलेले गोळे आता साखरेच्या पाकात ३-४ तास मुरु द्यावे.
सर्व्ह करतांना वरून बदामाचे काप व गुलाब पाकळ्या घालून सजवावे.