वाँलनट चॉकलेट केक: चॉकलेट वाँलनट केक ही एक डेझर्ट रेसिपी आहे. चॉकलेट वाँलनट केक हा चवीस्ट लागतो. केक बनवायला सोपा आहे व झटपट होणारा आहे. क्रिसमस मध्ये म्हणजेच नाताळ मध्ये आपण अश्या प्रकारचा केक बनवू शकतो किंवा घरी मुलांचे वाढदिवसच्या दिवशी बनवू शकतो.
चॉकलेट वाँलनट केक बनवण्यासाठी मैदा, कोको पावडर, अंडे, साखर, लोणी व आक्रोड वापरले आहेत.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
बेकिंगसाठी वेळ: ३५-४० मिनिट
वाढणी: ४ जनासाठी
साहित्य:
१ कप मैदा
२ टे स्पून कोको पावडर
३/४ कप लोणी किंवा बटर
३/४ कप साखर
१ टी स्पून बेकिंग पावडर
१/४ कप दुध
१/४ कप आक्रोड तुकडे
१ टी स्पून बटर बेकिंग ट्रेला लावण्यासाठी
कृती:
प्रथम मैदा, कोको पावडर व बेकिंग पावडर चाळून बाजूला ठेवा. अंडे चांगले फेटून बाजूला ठेवा.
एका बाउल मध्ये बटर व साखर विरघळून जाईल इतपत फेटून घ्या. मग त्यामध्ये अंडे घालून परत मिश्रण हलके होई परंत फेटून घ्या. नंतर त्यामध्ये चाळलेला मैदा घालून मिश्रण एक सारखे करून त्यामध्ये दुध व वाँलनटचे तुकडे घालून परत हलवून घ्या.
बेकिंग ट्रेला आतून बटर लावून घ्या. मग त्या ट्रेमध्ये मिश्रण ओतून एक सारखे करून घ्या.
मायक्रोवेव कन्व्हेक्शन मोडवर १८०० वर प्रीहीट करून घ्या. ओव्हन प्रीहीट झाल्यावर ट्रे ओव्हनमध्ये ठेवून कन्व्हेक्शन मोड वर ३५-४० मिनिट बेक करायला ठेवा. केक बेक झाल्यावर ओव्हन बंद करून २० मिनिट ओव्हनमध्येच ठेवा. नंतर छान सर्व्ह करा.