शाही उपवासाचा मखाने ड्राई फ्रूट चिवडा: उपवासाचा चिवडा हा महाशिवरात्र या दिवशी किंवा इतर उपवासाच्या दिवशी सुद्धा बनवायला छान आहे. शेंगदाणे मध्ये प्रोटीन बहुतांश असतात, मखाने मध्ये कार्बोहाईड्रेट तसेच बदाम, काजू, सुके खोबरे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला पण हितावह आहेत.
लहान मुलांना सुद्धा अश्या प्रकारचा चिवडा आवडतो व तो पौस्टिक सुद्धा आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१/४ कप शेंगदाणे
१ १/२ कप मखाने
१/४ कप काज
१/४ कप बदाम
१/२ कप सुके खोबरे (उभे चिरून)
१/४ कप बेदाणे व मनुके
१/४ कप तूप,
मीठ व पिठीसाखर चवीने
फोडणी करीता:
४-५ हिरव्या मिरच्या
१५-२० कडीपत्ता पाने
१ टी स्पून जिरे
कृती: मखाने जर आकारानी मोठे असतील तर त्याचे कापून दोन भाग करून घ्या. एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये शेंगदाणे गुलाबी रंगावर तळून घ्या व बाजूला ठेवा, मग बदाम, काजू, सुके खोबरे पण गुलाबी रंगावर तळून घ्या.
त्याच कढईमधे १ टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये जिरे, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता फोडणीत घालून त्यामध्ये मखाने घालून ४-५ मिनिट मंद विस्तवावर कुरकुरीत होईस्तोवर परतून घ्या.
मग त्यामध्ये तळलेले शेगदाणे, काजू, बदाम, सुके खोबरे, किसमिस, मनुके घालून मीठ व पिठीसाखर घालून १-२ मिनिट परतून घ्या.
उपवासाचा मखाने चिवडा छान टेस्टी लागतो.