जैन पालक मखाने: जैन पद्ध्तीची स्पिनाच मखाने भाजी. जैन पालक मखाना बनवताना कांदा, आले=लसून न वापरता बनवले आहे. पंजाब व गुजरात मह्या प्रांतात अश्या प्रकारची भाजी उपवासाला बनवतात. जैन पालक माखने ही भाजी बनवतांना प्रथम पालक प्युरी बनवून घेतली आहे.
पालक ह्या भाजीमध्ये जीवनसत्व ‘ए’ ,’बी’ , ‘सी’ आणि ‘इ’ तसेच प्रोटीन, सोडीयम, कॅलशीयम, फॉस्फरस व लोह आहे तसेच मखानेमध्ये प्रोटीन, कैल्शियम, पोटेशियम, फास्फोरस, आयर्न, केरोटीन, विटामिन बी-1, वसा, खनिज तत्व व सोडियम च्या बरोबर ते एंटीऑक्सीडेंट़् आहे. त्यामुळे अश्या प्रकारची भाजीचे सेवन करणे म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.
The English language version of the same Palak Makhana recipe and preparation method can be seen here – Spinach Makhana Vegetable Preparation
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप पालक प्युरी
१ छोटा टोमाटो
१/२ कप मखाना
१ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून गरम मसाला
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद (एछिक)
१ दालचीनी तुकडा
२ टे स्पून दुध
१ टे स्पून फ्रेश क्रीम
१ टे स्पून तूप
मीठ चवीने
कृती:
पालक स्वच्छ धुवून उकडून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटताना त्यामध्ये हळद , हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्या. टोमाटो उकडून त्याची प्युरी करून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून जिरे व टोमाटो प्युरी घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेला पालक, मीठ, दालचीनी पूड घालून दुध घाला, मिक्स करून २-३ मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये फ्रेश क्रीम व मखाने घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर मखाने शिजू द्या.
गरम गरम जैन पालक मखाने पराठा बरोबर सर्व्ह करा.