महाशिवरात्री स्पेशल थंडाई: महाशिवरात्री म्हणजे थंडाई तर हवीच ना. महाशिवरात्र ह्या दिवशी मुद्दामहून थंडाई बनवली जाते, कारण की ह्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात. थंडाईच्या सेवनाने आपले शरीर थंड राहते. व ते पौस्टिक सुद्धा आहे. थंडाई बनवतांना गुलकंद, बदाम, मगज बी, खसखस, बडीशेप वापरली आहे. भारतातील थंडाई हे पेय एक पारंपारिक पेय आहे.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
१ कप दुध
१ १/२ कप साखर
२ टे स्पून गुलकंद
१ १/२ लिटर पाणी
१ टे स्पून बदाम
१ टे स्पून कलिंगडचे बी
१ टी स्पून मिरे
१/२ टे स्पून खसखस
१/२ टे स्पून बडीशेप
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
साखर व अर्धा कप पाणी मिक्स करून बाजूला ठेवा. एका भांड्यात १ कप पाणी घेवून त्यामध्ये बदाम, कलिंगडचे बी, मिरे, खसखस, बडीशेप १ १/२ ते २ तास भिजत ठेवून मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. गरज असेलतर अजून थोडे पाणी घालून वाटा. मग वस्त्रगाळ गाळून घ्या. म्हणजे गाळून फक्त अर्क भांड्यात जमा होईल.
मग भांड्यातील अर्कात दुध, साखर, रोझ वॉटर घालून मिस्क करून घ्या. मिक्स केल्यावर वेलचीपूड घालून फ्रीजमध्ये १-२ तास छान थंड करायला ठेवा. मग थंड थंड थंडाई सर्व्ह करा.