फ्रेश राजमा बियाची भाजी: सीझनमध्ये आपल्याला राजमाच्या शेंगा मिळतात त्या सोलून आपण त्याची भाजी बनवू शकतो मस्त टेस्टी लागते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. राजमा चपाती सर्व्ह करा.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम फ्रेश राजमा शेंगा
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ छोटा टोमाटो (चिरून)
१ छोटा बटाटा (सोलून, चिरून)
१ १/२ टी स्पून लाल मिरची
१ टी स्पून गरम मसाला
२ टे स्पून ओला नारळ (खोवून)
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
७-८ लसून पाकळ्या (ठेचून)
७-८ कडीपत्ता पाने
१/२ टी स्पून हळद
कृती: प्रथम राजमा कुकरमध्ये उकडून घ्या म्हणजे भाजी झटपट होते किंवा कुकरमध्ये नाही उकडला तरी चालेल पण मग भाजी शिजायला वेळ लागतो.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, ठेचलेले लसून, कडीपत्ता घालून चिरलेला कांदा व टोमाटो घालून दोन मिनिट परतून घ्या.
कांदा परतून झाला की त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, बटाटा. राजमा, मीठ चवीने व एक कप पाणी घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवा. झाकणावर पाणी घालून राजमा शिजायला ठेवा. राजमा कुकरमध्ये उकडला तर ५-७ मिनिट फक्त शिजवून घ्या. कुकरमध्ये नाही शिजवला तर १५-२० मिनिट शिजायला वेळ लागतो.
राजमा शिजला की त्यामध्ये ओला खोवलेला नारळ व कोथंबीर घालून मिक्स करून घ्या. अश्या प्रकारचा राजमा बनवतांना थोडा रस्सा ठेवा म्हणजे चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागतो.
गरम गरम राजमा चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर मस्त लागतो.
The Marathi language video of this Fresh Rajma Bhaji Recipe can on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=ZQESk1dlTOQ