कोकणी पद्धतीची आंबटगोड कैरी-नारळाची चटणी: कच्या कैरी व नारळाची चवीस्ट चटणी बनवायला सोपी आहे. अश्या प्रकारच्या चटणीने तोंडाला छान चव येते. झटपट होणारी कोकणातील लोकप्रिय चटणी आहे. आपण इडली, डोसा, वडे किंवा तोंडी लावायला ही चटणी सर्व्ह करू शकतो.
कच्ची कैरीची चटणी बनवतांना ओला नारळ, कैरी, आले-लसून-मिरची मीठ व साखर वापरली आहे.
The English language version of the same Konkani Green Chutney recipe can be seen here – Ambat-God Hirvi Konkani Chutney
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप ओला नारळ (खोवून)
१/४ कप कैरी (तुकडे किंवा किसून)
१/४ कप कोथंबीर
७-८ लसून पाकळ्या
१/२” आले तुकडा
२ हिरव्या मिरच्या
मीठ व साखर चवीने
कृती:
प्रथम कैरी धुऊन साले काढून त्याचे तुकडे करा किंवा किसून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात खोवलेला नारळ, कैरी, कोथंबीर, लसून, आले, हिरव्या मिरच्या, मीठ अ साखर घालून २ टे स्पून पाणी घालून वाटून घ्या.
आंबटगोड कैरीची चटणी इडली, डोसा, उतप्पा, वडे, किंवा तोंडी लावायला सर्व्ह करा.
The video in Marathi of this Maharashtrian Green Kairi Coconut Chutney can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=PIH2oyoCLPw