दुधीभोपळ्याचा हलवा: दुधीभोपळ्याचा हलवा सोप्या पद्धतीने कसा झटपट बनवता येतो ते पहा. दुधीभोपळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
मस्तकाची उष्णता दूर होऊन आपल्या मेंदूला शक्ती मिळते व तरतरी येते. शक्तीदायक आहे. जे अशक्त रुग्ण आहेत त्यांच्या साठी दुधी हा उत्तम आहे.
ज्याची प्रकृती उष्ण आहे त्याच्या साठी दुधी अगदी उत्तम आहे थंड सुद्धा आहे. दुधी हृदयास हितकारी आहे, पिक्त व कफनाशक असून रुची उत्पन्न करणारा आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
५०० ग्राम दुधीभोपळा
१ कप किंवा ३/४ कप साखर
२ कप दुध
१ टे स्पून साजूकतूप
१ टी वेलचीपूड
ड्रायफ्रुट सजावटीसाठी
कृती:
प्रथम दुधीभोपळा धुऊन त्याची साले काढून किसून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये किसलेला दुधीभोपळा घालून दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये दुध घालून आटवून घ्या. मिश्रण आटलेकी त्यामध्ये साखर व वेलचीपूड घालून मिश्रण अजून थोडे घट्ट होई परंत आटवून घ्या.
दुधीभोपळा हलवा गरम किंवा छान थंड करून सुद्धा सर्व्ह करता येतो.
The Marathi language video of this Dudhi Bhopla Halwa recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=rWpWKIpQK1g