स्वीट डिलीशियस मँगो फालूदा आईसक्रिम: ही एक छान डेझर्ट आहे. उन्हाळा आला की आंब्याचा सीझन चालू होतो मग आपण आंब्याच्या रसा पासून नानाविध पदार्थ बनवतो. आंब्याच्या जूस पासून आपण मँगो फालूदा आईसक्रिम बनवू शकतो. हे एका मोठ्या ग्लास मध्ये किंवा जारमध्ये करतात. हे बनवतांना सब्जा बी पाण्यात भिजवून, सेवया थोड्या मोकळ्या शिजवून, आंब्याच्या फोडी, आंब्याचा रस व ड्रायफ्रुट ने सजवून थंड सर्व्ह करतात. आपल्याला अगदी आईसक्रिम पार्लरमध्ये बनवतात तसेच बनवता येते.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ३ जणासाठी
साहित्य:
२ कप दुध
२ टे स्पून साखर
२ मोठे हापुस आंबे रस काढून
२ टे स्पून सब्जा बी
२ टे स्पून सेवया
४ स्कुप वनीला आईसक्रिम
ड्रायफ्रुट सजावटीसाठी
आंब्याचे पिसेस सजावटीसाठी
कृती:
प्रथम १/२ वाटी पाण्यात सब्जा बी भिजत ठेवा. मग शेवया शिजवून चाळणीवर निथळत ठेवा.आंब्याचा रस मिक्सरमध्ये काढून घ्या.
आंब्याचा रस, दुध व साखर मिक्सरमधून काढून त्याचा जूस बनवून घ्या.
३ काचेचे आकर्षक ग्लास घेवून त्यामध्ये प्रथम आंब्याचा मिल्क शेक मग सब्जा बी व आंब्याच्या फोडी मग शेवया घालून वरती वनीला आईसक्रिम घालून ड्रायफ्रुट व आंब्याच्या फोडी घालून सजवून थंड गार सर्व्ह करा. जर आपल्याला वेगळ्या क्रमाने सुद्धा ग्लास लावता येईल.
The video in the Marathi language of this Mango Faluda Ice Cream Recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=cEnS2qT8tTE