हेल्दी पंचरंगी सलाड फॉर वेट लॉस रेसिपी: पंचरंगी सलाड हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. ज्यांना weight loss करायचे आहे त्याच्या साठी हे खूप फायदेशीर आहे. कारण की हे सलाड बनवताना काकडी, कोबी, शिमला मिर्च, गाजर व टोमाटो वापरले आहे व हे सर्व किती पौस्टिक आहे ते आपण बघणार आहोत.
कोबी आपल्या आरोग्यासाठी हितावह आहे. कोबी मध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॉसफरस, कॅल्शियम, लोह आहे तसेच जीवनसत्व Vitamin ‘A” , “B” व “C” आहे.
काकडी Cucumber पित्त, दाह, मुतखडा ह्यावर गुणकारी आहे. तसेच ती थंड आहे त्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. काकडीचे अश्या प्रकारचे सलाडचे सेवन केल्यास लघवीची जळजळ दूर होते व ती पाचक आहे.
टोमाटोमध्ये जीवनसत्व Vitamin “ A” , “B” व “C” भरपूर प्रमाणात आहे. त्यात रक्त निर्माण करणारे घटक आहेत. आपल्या शरीरातील उत्साह, व जोम वाढवणारा, रक्त वर्धक असा एक आंबट गोड पदार्थ आहे.
शिमला मिर्चमध्ये मेटाबॉलिज्म वाढण्यासाठी मदत होते जर आपले वजन वाढवायचे आहे किंवा ते कमी करायचे तर शिमला मिर्च खूप फायद्याची आहे. ह्यामध्ये एंटी ऑक्सीडेंट गुण आहे व Vitamin विटामिन “A” व “C” भरपूर आहे. कैंसर होण्यापासून वाचता येते.
गाजरात प्रोटीन, चरबी, कार्बोहायड्रेट, फॉसफरस, कॅल्शियम, व स्टार्च आहे. कॉरोटीन विपुल प्रमाणात आहे. जीवनसत्व “A” भरपूर प्रमाणात आहे. त्याच्या सेवनाने डोळ्यांना व त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे, तसेच रक्त वृद्धी होते.
हेल्दी पंचरंगी सलाड बनवण्यासाठी खूप सोपे आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप काकडी (बारीक चिरून)
१ कप कोबी बारीक (उभा चिरून)
१/२ कप टोमाटो (बिया काढून चिरून)
१/२ कप शिमला मिर्च (बिया काढून बारीक चिरून)
१/२ कप लाल गाजर (किसून)
१ मध्यम कांदा (बारीक चिरून)
१/४ कप शेंगदाणे कुट
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१/४ कप कोथंबीर चिरून
१ टे स्पून लिंबूरस
साखर व मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टे स्पून तूप/ तेल
१ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून हिंग
कृती: प्रथम सर्व भाज्या धुवून घ्या. कोबी बारीक उभा चिरून घ्या. काकडी सोलून बारीक चिरून घ्या. गाजर सोलून किसून घ्या. शिमला मिर्च बिया काढून बारीक चिरून घ्या. टोमाटो बिया काढून चिरून घ्या. कांदा हिरवी मिरची व कोथंबीर चिरून घ्या. शेगदाणे भाजून सोलून कुट करून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउल मध्ये कोबी, काकडी, गाजर, शिमला मिर्च, टोमाटो, कांदा, कोथंबीर, हिरवी मिरची, दाण्याचा कुट, ओला नारळ, मीठ, साखर, लिंबूरस घालून मिक्स करून घ्या.
एका फोडणीच्या कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये जिरे व हिंग घालून फोडणी करून मिक्स केलेल्या सलाड मध्ये घाला व मिक्स करून थंड करायला ठेवा.
थंडगार हेल्दी पंचरंगी सलाड सर्व्ह करतांना वरतून कोथंबीर व ओले खोबरे घालून सजवून मग सर्व्ह करा.
The Marathi language video of this Healthy Salad for Weight Loss / Weight Gain can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=UvyCGJbmujU