महाराष्ट्रीयन स्टाईल चमचमीत चणाडाळ घोसाळ्याची भाजी: घोसाळी ही गोड, थंड, वातूळ, अग्निदीपक व कफकारक असतात. तसेच ती दमा,खोकला, ताप, व कृमी दूर करतात. तीच्या सेवनाने रक्त पिक्त व वायू हे विकार दूर होतात. घोसाळी वातूळ नसतात.
घोसाळ्याची किंवा गिलकीची भाजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे तसेच त्यामध्ये चणाडाळ भिजवून घातली तर भाजी छान चवीस्ट लागते. घोसाळ्याची भाजी चपाती, भाकरी बरोबर मस्त लागते. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला किंवा ऑफिसमध्ये जातांना टिफिनमध्ये न्यायला मस्त आहे.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ३ जणासाठी
साहित्य:
२ मोठी घोसाळी
२ टे स्पून चना डाळ (भिजवून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
२ टे स्पून नारळ (खोवून)
२ टे स्पून कोथंबीर
मीठ चवीने
फोडणी साठी:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
कृती: प्रथम चणाडाळ २-३ तास भिजत ठेवा. घोसाळी धुवून साले काढून चिरून घ्या. ओला नारळ खोवून घ्या. कोथंबीर चिरून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी. जिरे, हिंग घालून चणाडाळ घाला. मग लाल मिरची पावडर, हळद, मीठ घालून चिरलेले घोसाळे घालून २ टे स्पून पाणी घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी घाला. मंद विस्तवावर घोसाळ्याची भाजी १० मिनिट शिजवून घ्या.
कढइ वरील झाकण काढून भाजी मध्ये ओला नारळ व कोथंबीर घालून २ मिनिट तशीच मंद विस्तवावर शिजू द्या.
गरम गरम घोसाळ्याची भाजी चपाती बरोबर सर्व्ह करा.
The Marathi langauge video of this Ghosale Bhaji Recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=e0upXyaTJLc