चीज अंडा भुर्जी ढाबा स्टाइल रेसिपी: चीज अंड्याची भुर्जी टेस्टी लागते. अंडे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
अंड्यामध्ये प्रोटीन, कैल्शियम और ओमेगा 3 फैटी एसिड हे भरपूर प्रमाणात असते. अंड्यातील प्रोटीन हे आपल्या शरीरातील मासपेशी मजबूत करतात. वजन कंट्रोल मध्ये रहाते. जेवणात एक अंडे खाल्लेतर आपल्या शरीरासाठी लागणारे कैरोटिनायड्स आपल्याला त्यातून मिळते. तसेच मोतीबिंदू होण्याची भीती कमी होते. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन “D” आहे जे आपल्या हाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्यामुळे आपली हाडे मजबूत बनतात. तसेच अंड्यामध्ये विटामीन “A”, “D”, B १२” व ” फास्फोरस” आहे.
चीज अंडा भुर्जी बनवतांना कांदा, टोमाटो, शिमला मिर्च, आले-लसून, कोथंबीर अंडी व चीज वापरले आहे त्यामुळे ती अगदी रेस्टॉरंट Restaurantसारखी किंवा ढाबा सारखी बनते. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला मस्त आहे.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
४ अंडी
१ मोठा कांदा (चिरून)
१ छोटा टोमाटो (चिरून)
१ छोटी शिमला मिर्च (चिरून)
१ टे स्पून आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१ चीज क्यूब (किसून)
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
कृती: कांदा, टोमाटो, शिमला मिर्च. कोथंबीर चिरून घ्या. आले=लसून-हिरवी मिरची वाटून घ्या. एका बाउलमध्ये अंडी फोडून त्यामध्ये लाल मिरची पावडर व हळद घालून काटे चमच्याने फेटून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये आले-लसून-हिरवी मिरचीचे वाटण घालून थोडे परतून टोमाटो व शिमला मिर्च घालून परतून मीठ व फेटलेले अंडे घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये किसलेले चीज व कोथंबीर घालून मिक्स करून ३-४ मिनिट भुर्जी मंद विस्तवावर शिजू द्या.
गरम गरम चीज अंडा भुर्जी चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Cheese Egg Bhurji Recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=fVDDyty8C0M&t=5s