लोकप्रिय आग्र्याचा अंगुरी पेठा घरी कसा बनवावा: अंगुरी पेठा हा कोहळ्या पासून बनवतात. चवीला टेस्टी व स्वीट डिश म्हणून बनवता येतो. आपल्याकडे सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा आपण बनवू शकतो.
पेठा हा हृद्य च्या विकारांनवर गुणकारी आहे तसेच पाचन व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हिता वह आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
पेठा ही आग्र्याची लोकप्रिय डिश आहे. पेठा बनवताना फक्त साखरेचा पाक बनवावा लागतो तेल किंवा तुपाचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे ही स्वीट डिश आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. पेठा बनवताना कोहळा चांगला पिकलेला पाहिजे कच्चा नको.
बनवण्यासाठी वेळ: २ तास
वाढणी: १/२ किलोग्राम
साहित्य:
१ किलो कोहळा
१ चमचा खायचा चुना
२ कप साखर
२ कप पाणी
रोझ इसेन्स
कृती: प्रथम पिकलेला कोहळा घेवून धुवून त्याची साले काढून आतील गर व बिया काढून टाका व बाकीच्या भागाच्या चौकोनी छोटे तुकडे करून घेवून त्याला काटे चमच्यानी टोचे मारून घ्या. मग एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात २-३ लिटर पाणी घेवून त्यामध्ये खायचा चुना घालून मिक्स करून त्यामध्ये कोहळ्याचे तुकडे घालून झाकून ८-१० तास बाजूला ठेवा. एका चाळणीमध्ये सर्व कोहळ्याचे तुकडे घेवून नळाखाली स्वच्छ धुवून घ्या.
एका स्टीलच्या जाड बुडाच्या भांड्यात २-३ लिटर पाणी घेवून विस्तवावर ठेवा साखर विरघळली की त्यामध्ये कोहळ्याचे तुकडे घालून मोठ्या विस्तवावर २० मिनिट शिजवून घ्या. पाणी काढून कोहळे चाळणीवर ठेवा.
एका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी घेऊन साखर विरघळे परंत हलवत राहा. साखर विरघळलिकी त्यामध्ये कोहळ्याचे तुकडे घालून साखरेचा पाक घट्ट होईपरंत हलवत रहा. पाक घट्ट म्हणजे चिकट झाला पाहिजे. मग विस्तव बंद करून भांडे झाकून १०-१२ तास बाजूला ठेवा पाकामध्ये कोहळ्याचे थोडे पाणी सुटेल. नंतर भांडे परत विस्तवावर ठेवून पाक घट्ट होई परंत गरम करा. पाक घट्ट झाल्यावर विस्तव बंद करून कोहळे चाळणीवर काढून घ्या. चाळणी एका भांड्यावर ठेवा. म्हणजे त्याला खालून हवा लागेल व चाळणीवर जाळीचे झाकण ठेवून पंख्याखाली २-३ तास ठेवा म्हणजे पेठे छान सुकतील.
पेठे जर तुम्हाला एक आठवड्या करीता ठेवायचे असतील तर ८-१० तास तसेच पंख्याखाली ठेवा. पूर्ण सुकल्यावर डब्यात भरून ठेवा.
The Marathi language video of of this Homemade Agra Angoori Petha recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=TzV0w-W5adc