सोपे हलके गरमागरम गव्हाच्या पीठाचे फुलके: गव्हाच्या पीठाचे फुलके बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला किंवा नाश्त्याला किंवा जेवणात बनवायला सोपे आहेत. फुलके हे वेट लॉस साठी अगदी फायदेशीर आहेत.
गहू हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गहू हा मधुर, थंड, वायू, व पिक्तशामक बलदाय क, रुची निर्माण करणारा, पचावयास जड आहे. गव्हाचे पीठ मळताना प्रमाणात तेल घालून पीठ मळलेतर चपाती पचायला हलकी बनते.
फुलके हे तव्यावर अर्धवट शेकून मग डायरेक्ट विस्तवावर भाजून घ्यायचे असतात. तसेच ते तांदळाच्या पिठीवर लाटले तर अजून हलके होतात. हे छान मऊ होतात व पचायला सुधा हलके आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: १०-१२ बनतात
साहित्य:
२ कप गव्हाचे पीठ
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ लाटण्यासाठी
वरतून लावण्यासाठी साजूक तूप (एछिक)
कृती:
एका परातीत गव्हाचे पीठ घेवून त्यामध्ये मीठ व आवशक्यता असेल तेव्हडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळल्यावर त्याला तेल लावून अर्धा तास बाजूला झाकून ठेवा म्हणजे कणिक चांगली मुरेल व पोळ्या किंवा फुलके चांगले मऊ होतील. कणिक मळताना फार घट्ट किंवा फार पातळ मळू नये सैल मळावी.
पीठ चांगले मुरल्यावर त्याचे छोटे गोळे करून घ्या. एक गोळा घेवून त्याला तांदळाची पिठी किंवा गव्हाचे पीठ लावून पातळ लाटून घ्या.
तवा गरम झालाकी फुलका त्यावर घालून अर्धवट शेकून उलट करा दसऱ्या बाजूनी सुद्धा अर्धवट शेकून घ्या. मग तवा विस्तवावरून खाली उतरवून फुलका डायरेक्ट विस्तवावर ठेवून चिमटा वापरून फुलवून घ्या.
फुलका दोनी बाजूनी फुलला की खाली उतरवून त्याला वरतून तूप लावा अश्या प्रकारे सर्व फुलके बनवून घेवून स्टीलच्या डब्यात किंवा केसरोल मध्ये ठेवा.
The video in Marathi of this Phulka recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=wAfCbfA8IO4