होम मेड स्वीट डिलिशीयास मजेदार म्हैसूर पाक: म्हैसूर पाक हा गोड पदार्थ आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतर सणावाराला सुद्धा बनवू शकतो तसेच बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. म्हैसूर पाक हे दोन प्रकारात बनवता येतात एक थोडासा मऊ (soft) व दुसरा कडक. कडक म्हैसूर पाकला जाळी पडते पण मऊ म्हैसूर पाकला जाळी पडत नाही पण चवीला अप्रतीम लागतो.
म्हैसूर पाक आपण घरी अगदी मिठाईच्या दुकानात बनवतात अगदी तसाच स्वादिष्ट बनवू शकतो. ह्याची एक गोष्ट आहे. म्हैसूर पाक ही दक्षिण भारतातील लोकप्रिय स्वीट डिश आहे. पूर्वीच्या काळी म्हैसूर च्या राजा कडील कूक (chef) नी एक नवीन पदार्थ बनवून बघितला व त्याने साखर पाक बनवून त्यात बेसन व तूप घालून बनवून बघितले व हा नवीन पदार्थ तयार झाला म्हणून ह्याचे नाव म्हैसूर पाक असे पडले.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप बेसन
१/२ कप तेल
१/२ कप साजूक तूप (थोडे अजून वरती घ्या)
१ कप साखर
१/४ टी स्पून बेकिंग सोडा
१ कप पाणी
कृती: सर्व प्रथम बेसन चाळणीने चाळून घ्या. मग एका जाड बुडाच्या कढईमधे साखर व पाणी घालून मिक्स करून मंद विस्तवावर साखर पूर्ण विरघळवून घ्या. दुसऱ्या एका कढईमधे तूप व तेल गरम करायला ठेवा. (तुम्हाला फक्त तूप वापरायचे असेल तरी चालेल) एका स्टीलच्या प्लेटला तुपाचा हात लाऊन ठेवा.
साखर पूर्ण विरघळलिकी त्यामध्ये हळूहळू थोडे थोडे बेसन घालत जा व सारखे हलवत रहा गुठळी होता कामा नये. बेसन सर्व घालून मिक्स करून झाले की त्यामध्ये ४-५ वेळा थोडे थोडे करून गरम तेल-तूप घालत जा व मिश्रण हलवत रहा. जेव्हा मिश्रण थोडे घट्ट होऊन कढईमधे तेल-तूप सुटायला लागेल तेव्हा विस्तव बंद करून घ्या.मग तयार झालेले मिश्रण लगेच तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्या. १० मिनिट तसेच ठेवा मग लगेच त्याच्या वड्या कापून घ्या.
म्हैसूर पाक पूर्ण थंड झाल्यावर स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. मी हा थोडा मऊ म्हैसूर पाक बनवला आहे जर तुम्हाला कडक हवा असेल तर मिश्रण अजून थोडे आटवून घ्या.
The Marathi language video of this Mysore Pak recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=fkspqwGI9t4&feature=youtu.be