मसाला लेमन टी: चहा हा सर्वाना प्रिय आहे. सकाळी उठल्यावर एक कप गरम चहा घेतला की आपण अगदी ताजेतवाने होतो व काम करायला उत्साह वाटतो. चहा हे पेय असे आहे की सकाळ दुपार संध्याकाळ कधी घेता येतो. पार्टी असो, लग्न कार्य असो, समारंभ असो किंवा कोणते पण कार्य असो चहा हा असतोच. आपण घरा बाहेर पडलो की आपल्याला ठीक ठिकाणी चहाच्या गाड्या दिसतात. आता तर वेगवगळ्या प्रकारचे चहा मिळतात.
चहा बनवून झाल्यावर भांड्यावर झाकण ठेवून एक मिनिट चहा मुरु द्यावा म्हणजे त्याची चव अजून मस्त येते व तो कडक चहा सुधा लागतो. जर सर्दी खोकला झाला असेलतर अश्या प्रकारचा चहा बनवून घ्या नक्की बरे वाटेल.
लेमन मसाला चहा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. लेमन मसाला टी बनवताना एक कप चहा साठी १/२ टी स्पून चहा पावडर वापरली आहे व एक टी स्पून साखर तसेच ह्यामध्ये दुध पण नाही. तर मग चहा बनवून बघा व त्याची टेस्ट घेवून बघा तुम्हाला नक्की आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: २ कप
साहित्य:
२ कप पाणी
२ टी स्पून साखर
१ टी स्पून चहा पावडर
१/२ टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने
मसाला करीता:
१/२” आले तुकडा (ठेचून)
१/४ टी स्पून मिरे पावडर
३ लवंग (ठेचून)
कृती: प्रथम मिरे व लवंग थोडे कुटून घ्या, आले थोडे ठेचून घ्या.
एका चहाच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा मग त्यामध्ये साखर व चहा पावडर घालून उकळी यायला लागली की त्यामध्ये आले, लवंग, मिरे पावडर व मीठ अगदी थोडेसे घालून मिक्स करून घ्या.
चहाला उकळी आली की त्यामध्ये लिंबूरस घालून लिंबूचे साल सुद्धा घाला. एक उकळी आल्यावर विस्तव बंद करून एक मिनिट झाकण ठेवा. मग झाकण काढून गरम गरम चहा सर्व्ह करा.
The Video of the same Lemon Tea Recipe and Preparation Method can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=BSdPEicWQwQ