होम मेड चॉकलेट ट्रफल व चॉकलेट किटकैट रेसिपी:
चॉकलेट म्हंटले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलान पासून मोठ्या परंत सर्वाना चॉकलेट आवडते. आपण घरच्या घरी छान अगदी बाहेर मिळतात तसे चॉकलेट बनवू शकतो. चॉकलेट हा पदार्थ असा आहे की आपण जेवणा नंतर किंवा इतर वेळी सुद्धा खावू शकतो. चॉकलेट हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत त्यानी आपल्याला एनर्जी मिळते. चॉकलेट ट्रफल व चॉकलेट किटकैट आपण डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो किंवा मुलांच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून सुद्धा देवू शकतो.
चॉकलेट ट्रफल व चॉकलेट किटकैट कसे बनवायचे व त्याचे गिफ्ट पेपरमध्ये कसे pack करायचे ते आपण ह्या विडीओ मध्ये सविस्तरपणे दिले आहे.
साहित्य:
चॉकलेट किटकैट बनवण्यासाठी
डार्क चॉकलेट बेस
वेफर बिस्कीट
चॉकलेट ट्रफल बनवण्यासाठी
डार्क चॉकलेट बेस, ३ टे स्पून डेसिकेटेड कोकनट
३-४ ओरीओ बिस्कीट (चुरा)
चॉकलेट सजावटीसाठी
डेसिकेटेड कोकनट
बडीशेपच्या छोट्या गोळ्या
कृती: प्रथम डार्क चॉकलेट बेस डबल बॉईलिंग पद्धतीने गरम करायला ठेवा. म्हणजेच एका बाउल मध्ये थोडे पाणी गरम करायला ठेवा. मग एका मध्यम आकाराचे भांड्यात डार्क चॉकलेट बेसचे तुकडे घेवून ते भांडे पाणी गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये ठेवा व चॉकलेट मंद विस्तवावर गरम म्हणजेच पातळ करून घ्या. चॉकलेट पूर्ण विरघळून झालेकी विस्तव बंद करून भांडे बाजूला काढून ठेवा. चॉकलेट थोडे थंड झाल्यावर चांगले फेटून घ्या.
चॉकलेट किटकैट बनवण्यासाठी मोल्ड घेवून त्यामध्ये थोडे चॉकलेट घालून त्यावर वेफर बिस्कीट ठेवून त्यावर थोडे चॉकलेट परत घाला व मोल्ड डीप फ्रीजमध्ये ५-७ मिनिट सेट करायला ठेवा. नंतर मोल्ड डीप फ्रीजमधून काढून चॉकलेट काढून घ्या.
चॉकलेट ट्रफल बनवण्यासाठी विरघळलेल्या चॉकलेट मध्ये डेसिकेटेड कोकनट व ओरीओ बिस्कीट चुरा घालून चांगले मिक्स करून घ्या. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्याचे एक सारखे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. त्याला सजवण्यासाठी एक गोळा घेवून डेसिकेटेड कोकनटमध्ये रोल करा मग दुसरा गोळा घेवून बडीशेपच्या छोट्या गोळ्यामध्ये रोल करा. अश्या प्रकारे सजवून घ्या.
आपले चॉकलेट तयार झाली की पेपरमध्ये गुंडाळून घट्ट झाकणाच्या डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा.
The video of this chocolate making recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=u8uQQCwKhYU