विना विस्तव सोपे इन्स्टंट चॉकलेट कोकनट मोदक/ रोस गुलकंद कोकनट मोदक रेसिपी
गणपती उत्सव आला की आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी व खिरापती साठी गोड पदार्थ बनवत असतो. तसेच आपण असे पदार्थ बघतो की ते झटपट व सोपे असतील तसेच सर्वाना आवडतील. त्यासाठी इन्स्टंट चॉकलेट कोकनट मोदक/ गुलकंद कोकनट मोदक हा पर्याय मस्त आहे. अश्या प्रकारचे मोदक चवीला मस्त लागतात व लवकर काही त्रास न घेता बनवता येतात.
इन्स्टंट चॉकलेट कोकनट मोदक बनवतांना डेसिकेटेड कोकनट, कंडेन्स मिल्क व चॉकलेट सॉस वापरला आहे. तसेच गुलकंद कोकनट मोदक बनवतांना डेसिकेटेड कोकनट, कंडेन्स मिल्क, गुलकंद, रोस सिरप वापरला आहे त्यामुळे अश्या मोदकांची टेस्ट अप्रतीम लागते.
इन्स्टंट चॉकलेट कोकनट मोदक/ गुलकंद कोकनट मोदक बनवतांना विस्तव वापरावा लागत नाही. आपण कंडेन्स मिल्क बाजारातून आणू शकता किंवा घरी सुद्धा बनवू शकता. कंडेन्स मिल्क कसे बनवायचे त्याचे कृती व साहित्य दिले आहे.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: २१ मोदक
होम मेड कंडेन्स मिल्क कसे बनवाल
साहित्य:
१/२ लिटर दुध
३/४ कप साखर
एक चिमुट खायचा सोडा
कृती: अर्धा लिटर दुध गरम करून त्यामध्ये ३/४ कप साखर व एक चिमुट खायचा सोडा घालून घट्ट होईस्तोवर आटवून घ्या.
साहित्य: गुलकंद रोज मोदक
१ कप डेसीकेटेड कोकनट
१/४ कप कंडेन्स मिल्क
१ टे स्पून गुलकंद
१ टे स्पून रोस सिरप
२-३ थेंब लाल खायचा रंग
साहित्य: चॉकलेट मोदक
१ कप डेसीकेटेड कोकनट
१/४ कप कंडेन्स मिल्क
१ टे स्पून चॉकलेट सॉस
कृती: सर्व प्रथम आपण बाजारातून कंडेन्स मिल्क आणा किंवा घरी ते खूप महाग असते तर आपण घरी सुद्धा बनवू शकतो.
गुलकंद रोज मोदक बनवण्यासाठी: एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये डेसीकेटेड कोकनट व कंडेन्स मिल्क मिक्स करून घ्या. मग त्याचे दोन एकसारखे भाग करून घ्या. एक भाग पांढराच ठेवायचा व दुसऱ्या भागात गुलकंद, रोस सिरप व लाल खायचा रंग घालून चांगले मिक्स करून घ्या.
पहिल्या भागाचे व दुसऱ्या भागाचे एक सारखे लहान लहान गोळे बनवून घ्या. त्यानंतर एक पांढरा भाग व एक लाल भाग घेऊन त्याचा मोदकाच्या मोल्डमध्ये मोदक बनवून घ्या किंवा त्याचा लाडू वळला तरी चालेल. अश्या प्रकारे सर्व मोदक किंवा लाडू बनवून घ्या.
चॉकलेट मोदक बनवण्यासाठी: एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये डेसीकेटेड कोकनट व कंडेन्स मिल्क मिक्स करून घ्या. मग त्याचे दोन एकसारखे भाग करून घ्या. एक भाग पांढराच ठेवायचा व दुसऱ्या भागात चॉकलेट सॉस घालून चागले मिक्स करून घ्या.
पहिल्या भागाचे व दुसऱ्या भागाचे एक सारखे लहान लहान गोळे बनवून घ्या. त्यानंतर एक पांढरा भाग व एक लाल भाग घेऊन त्याचा मोदकाच्या मोल्डमध्ये मोदक बनवून घ्या किंवा त्याचा लाडू वळला तरी चालेल. अश्या प्रकारे सर्व मोदक किंवा लाडू बनवून घ्या.
आपले इन्स्टंट चॉकलेट कोकनट मोदक/ रोस गुलकंद कोकनट मोदक प्रसादासाठी तयार आहेत.
The Marathi language video of this Modhal Recipe can be seen on our YouTube Channel – Instant Chocolate Coconut and Gulkand Coconut Modak