दिवाळी फराळ सहज सोपे खुसखुशीत रवा मैदा शंकरपाळी/शंकरपाळे
महाराष्ट्रात दिवाळी ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतात हा एक महत्वाचा सण आहे. दीपावलीमध्ये नानाविध फराळाचे पदार्थ बनवले जातात. दिवाळी फराळाची थाळी म्हणजे लाडू, चिवडा, चकली, शेव, शंकरपाळी बनवतात.
शंकरपाळी आपण वेगवेगळ्याप्रकारे बनवु शकतो. गोड शंकरपाळे, नमकीन, पाकातले. शंकरपाळे आपण दिवाळी फराळासाठी किंवा इतरवेळी किंवा कुठे प्रवासाला जातांना बनवू शकतो.
गोड शंकरपाळी बनवतांना मैदा व रवा वापरला आहे. रवा घालून शंकरपाळी बनवली की छान खुसखुशीत क्रिस्पी होते. नुसता मैदा वापरला तर तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही. शंकरपाळीचे पीठ भिजवले की एक तास झाकून बाजूला ठेवा म्हणजे रवा छान फुगून येईल व आपली शंकरपाळी छान खुसखुशीत होईल. तसेच दुध, मीठ व वेलचीपूड वापरली आहे त्यामुळे अजून छान टेस्टी बनते
साहित्य:
३ कप मैदा
१ कप रवा
१ कप वनस्पती तूप अथवा तेल
१ कप दुध
१ १/२ कप साखर (जाड)
मीठ चवीने
१/२ टी स्पून वेलचीपूड
तेल अथवा वनस्पती तूप तळण्यासाठी
कृती: प्रथम मैदा व रवा चाळून बाजूला ठेवा. दुध गरम करून थंड करून ठेवा.
एका स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात दुध, वनस्पती तूप अथवा तेल व साखर घालून मंद विस्तवावर ठेवून साखर पूर्ण विरघळून जाईस्तोवर गरम करा. साखर पूर्ण विरघळलिकी विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा. मिश्रण पूर्ण थंड झालेकी त्यामध्ये मैदा, रवा, चवीने मीठ, वेलचीपूड घालून पीठ मळून घ्या. जर पीठ खूप सैल वाटलेतर थोडा रवा व मैदा घालून पीठ मळून घ्या. पीठ आपण चपातीच्या साठी मळतो तसे झाले पाहिजे. मग मळलेले पीठ एक तास झाकून ठेवा म्हणजे पीठ चांगले मुरेल व रवापण चांगला फुलून येईल.
मळलेल्या पीठाचे एक सारखे ४-५ गोळे बनवून घ्या. एक पिठाचा गोळा घेवून थोडासा जाडसर लाटून घेवून कटरच्या सहायाने कापून घ्या. बनवलेले शंकरपाळे एका स्वच्छ कापडावर ठेवा. अश्या प्रकारे सर्व शंकरपाळे बनवून घ्या.
कढईमधे तेल अथवा तूप गरम करून घ्या. विस्तव मोठा ठेवून गरम गरम तेलात थोडी शंकरपाळी घालून थोडे तेल कढईमधील शंकरपाळीवर सोडा व लगेच विस्तव मंद करा व छान कुरकुरीत शंकरपाळी दोनी बाजूनी तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व शंकरपाळ्या तळून घ्या. शंकरपाळे तळून झालेकी टिशू पेपरवर ठेवा म्हणजे जास्तीचे तेल अथवा तूप निघून जाईल.
शंकरपाळे पूर्ण थंड झाल्यावर हवा बंद डब्यात भरून ठेवा. हे शंकरपाळे १५ दिवस छान राहतात.
आमच्या साईटवर शंकरपाळी/ शंकरपाळे अजून काही विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण शंकरपाळी रेसिपी बघा:
https://www.royalchef.info/2017/07/pakatle-shankarpali-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2017/04/amba-shankarpali-recipe-marathi.html
https://www.royalchef.info/2016/11/kurkurit-moong-urad-dal-fafda-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2016/10/kurkurit-salted-shankarpali-for-diwali-faral-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2016/10/khari-champakali-for-diwali-faral-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2016/08/gajarachi-shankarpali-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2016/08/lal-bhoplyachi-shankarpali-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2016/07/jaggery-shankarpali-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2015/10/cheese-shankarpali-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2015/10/kasuri-methi-shankarpali-recipe-in-marathi.html
The video in Marathi of this Shankarpali recipe can be seen on our YouTube Channel – Sweet and Crispy Shankaarpali for Diwali Faral