चांगली चकली बनवण्यासाठी व त्या बिघडल्यातर दुरुस्त करण्याच्या काही महत्वाच्या टिप्स
दसरा झालाकी महाराष्टात महिला दिवाळी फराळाची तयारी करायला लागतात. फराळामध्ये आपण करंजी , लाडू, शंकरपाळी, शेव, चिवडा बनवतो.
आज काल फराळचे फुजन आले आहे म्हणजे आपण वेगवेगळ्याप्रकारे पदार्थ बनवतो. चकली सुधा वेगवेगळ्याप्रकारे बनवताना.
चकली बनवताना काही वेळेस म्हणजे काही छोट्या छोट्या कारणामुळे आपली चकली बिघडते मग बिघडलेली चकली कशी दुरुस्त करायची ह्या बद्दल काही टिप्स दिल्या आहेत.
दिवाळी फराळ चकली बनवण्यासाठी काही टिप्स
चकलीची भाजणी बनवतांना तांदूळ व बुटका तांदूळ वापरावा. तांदूळ व डाळी धुवून घ्या. सुकल्यावर भाजणी मंद विस्तवावर भाजून मग बारीक दळून आणा.
चकली बनवताना लोणी, तेल किंवा तुपाचे मोहन घ्याव. म्हणजे चकली कुरकुरीत होते.
चकलीचे पीठ मळताना तिखट फार लाल रंगाचे वापरू नये नाहीतर चकलीचा रंग बदलतो.
पीठ मळताना गरम पाणी वापरावे पीठ घट्ट मळू नये नाहीतर चकली कडकडीत होते किंवा मऊ होते.
चकली बनवताना पाण्याचा हात लावून पीठ चांगले मळून घ्या.
चकली तळताना तेल चांगले तापले आहे की नाही ते आगोदर एक तुकडा तळून पहावा, चकली गरम तेलात सोडतांना विस्तव मोठा ठेवावा मग मध्यम ठेवावा.
चकली तळल्यावर पेपरवर ठेवावी मग थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी.
चकली करताना जर बिघडली तर काय करावे.
चकली सोरयातून पिळताना मधेच तुटायला लागलीतर सोरयातून गोळा परत काढून पाण्याचा हात लावून चांगला मळून परत सोऱ्यात घालून चकल्या पाडाव्या.
चकली पिळताना छान काटेदार दिसली नाहीतर ओळखावे की पाणी जास्त झाले आहे . अश्यावेळी सोरयातून गोळा बाहेर काढून त्यात १-२ चमचे भाजणीचे पीठ घालून परत चांगले मळून मग चकल्या कराव्या.
चकली थोडा वेळानी मऊ पडण्याची कारणे १) चकली मळताना पाणी जास्त घातले गेले. २) चकली तळताना घाई केली व मोठ्या विस्तवावर तळली जेणे करून ती वरतून लाल व आतून कच्ची राहिली. ३) चकली पूर्ण बुडबुडे येई परंत तळणी नाही.
चकली खुसखुशीत होत नाही असे दिसले तर गोळ्यावर कढई मधील २ चमचे गरम गरम तेल घालून परत गोळा मळावा. मग चकल्या छान कुरकुरीत होतील.
तेल चांगले तापल्यावर त्यात चकल्या टाकाव्या नाहीतर त्या विरघळून तेलात खूप बुडबुडे येतात व फेस होतो. अश्या वेळी दुसऱ्या कढईवर कापड ठेवून त्यामध्ये तेल गाळून घ्यावे.
चकलीचे काही नवीन प्रकार आमच्या साईटवर आहेत त्याची लिंक description मध्ये देत आहे.
https://www.royalchef.info/2019/09/traditional-maharashtrian-chakli-bhajani-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2018/11/khamang-maharashtrian-chakli-bhajani-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2018/10/khushkhushit-nachni-chi-chakti-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2017/08/crispy-and-delicious-butter-chakli-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2017/08/crispy-and-tasty-murukku-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2017/08/colorful-beetroot-chakli-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2017/08/tasty-palak-chakli-recipe-in-marathi.html
https://www.royalchef.info/2017/08/besan-masala-chakli-recipe-marathi.html
https://www.royalchef.info/2017/04/recipe-crispy-spicy-jowar-flour-chakli.html
https://www.royalchef.info/2017/03/moong-dal-chakli-recipe-in-marathi.html
Bhajni, Pani ani telache praman kiti gyave?