गृहीणीसाठी सोप्या स्वयंपाक घरातील कानगोष्टी भाग 1
गृहीणीना स्वंपाकघर हे जास्त प्रिय असते कारण दिवस भरातील बराच काळ त्या किचनमध्ये घालवत असतात. तेव्हा काही सहज सोप्या टीप्स उपयोगात आणल्या तर त्या आपल्या रोजच्या व्यवहारात जास्त उपयुक्त पडतात.
काही सहज सोप्या टीप्स कान गोष्टी म्हणजे आपल्या रोजच्या वरण भात कसा करायचा किवा जेवण बनवताना व्हीटामीन प्रोटीन व उपयुक्त घटक कसे राहतीतल. पोळ्या बनवताना कणीक काशी मळायची म्हणजे पोळ्या कश्या छान मवू लुसलुशीत होतील. तूप कसे कढवावे, पालेभाज्या कश्या शीजवाव्या, दही कसे लावावे.
ह्या सहज सोप्या टीप्स आपण लक्षात ठेवल्यातर आपल्याला स्वयंपाक करताना त्याची मदत होते व जेवणातील अन्न घटक सुध्या वाया जात नाहीत.
सहज सोप्या स्वयंपाक घरातील कानगोष्टी गृहीणीसाठी भाग 1 आपण आमच्या साईटवर येथे बघू शकता:
तांदूळ शीजवण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा. अधीक वेळा धूतलयास त्यातील “बी” व्हीटामीन नाहीसे होते तसेच भात कुकरमध्ये न ठेवता तसाच करावयाचा असल्यास, भातात पाणी प्रमाणात घालावे. कारण जास्त पाणी घातल्यास कढ येवून ते ओसंडून गेले टीआर त्यातील “बी” व्हीटामीन कमी होते.
मसालेभात तयार होत आला की समजा- अर्धा शेराचा मसालेभात असल्यास एक चमचा ताक, एक चमचा साखर, चार चमचे साजूक तूप असे एकत्र करून भातात सर्व बाजूंनी सोडावे म्हणजे भात चांगला मोकळा, चवीस्ट होतो व चकचकीत दिसतो.
कणिक भीजवताना थोडा दुधाचा उपयोग करून कणिक भीजवावी पोळ्या छान मऊ व अधिक चवीस्ट लागतात.
पोळ्या करताना पोळी झाल्यावर ती भाजताना तिला साजूक तूप लावाले तर ती अधिक खमंग लागते.
पालेभाज्या परतण्या पेक्षा उकडून उपयोगात आणाव्यात म्हणजे त्या पचनास अधिक सुलभ होतात.
बटाट्याचे काप अधिक रुचकर लागण्यासाठी ते प्रथम मीठच्या पाण्यात बुडवून तळण्यापूर्वी संपूर्ण सुकू द्यावेत व मग ते तळावेत.
लोण्यात किवा साजूक तुपात बटाटे काप तळले तर त्याची चव जाते. त्या करता तेलात तळावे.
तुरीच्या डाळीचे वरण लवकर आणि चांगले शिजण्यासाठी ते डाळ लावताना थोडेसे तेल घालावे.
ताज्या दुधात जर एक चीमुट मीठ घातले तर ते दूध बराच काळ परत न नासता राहू शकते.
दुधातून तुरटी फिरवून वीरजण लावल्यास विरजण अगदी घट्ट होते.
लोण्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला वास येत नाही.
चहा आणि कोकोत चीमुटभर मीठ मिसळल्यास त्याची चव जास्त मधुर लागते.
हिरव्या रंगाचा भाजीपाला उकडताना वा शिजवताना तो लवकर शिजावा यासाठी भांड्यावर झाकण काढून ठेवावे.
मुळा किसून झाल्यावर त्याला पाणि सूटते ते जर तुरीच्या डाळीच्या आमटीत घातले तर त्याचा स्वाद रुचकर लागतो.
थंडीच्या दिवसात सायीचे ताक लवकर होण्यासाठी त्यात थोडेसे गरम पाणि घालावे व मग ते घूसलावे. अगर ताक करण्यापूर्वी ताकाचे भांडे व रवी गरम पाण्याने धुवून घ्यावी. रवीला लोणी चिटकत नाही.
The video in the Marathi language of this article can also be seen on our YouTube Channel – Simple and Easy Kitchen Tips for Housewives in Marathi