लज्जतदार चाकवताची पातळ भाजी
पालेभाज्या ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहेत. खर म्हणजे आपले आरोग्य हे आपणच बनवलेल्या अन्नावर अवलंबून आहे.
आपल्याला निरोगी ठेवणे. एमएन प्रसन्न ठेवणे तसेच शरीराला ताकद देणे हे मोठी देणगी रसरशीत, ताज्या सर्व प्रकारच्या पाले भाज्या किवा फळ भाज्यामध्ये आहे. ह्या भाज्या क्षार व जीवनस्त्व युक्त असतात. त्या आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवून चवीष्ट बनवतो.
आपण जेवणात नेहमी एक सुकी व एक पातळ भाजी बनवतो. चाकावताची पातळ चावीस्ट भाजी बनवून बघा. चाकावताची पातळ भाजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. गरम गरम भाजी चपाती भाकरी किवा भाता बरोबर सर्व्ह करा.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
2 जुडया चाकवत ताजी भाजी
1/4 कप चणाडाळ
1/4 कप शेंगदाणे
3 कप आंबट ताक
5-6 हिरव्या मिरच्या
2 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
1/2 कप बेसन
फोडणी करीता:
2 टे स्पून तूप
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जीरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
कृती:
आधल्या दिवशी रात्री चणा डाळ व शेंगदाणे वेगवेगळे भिजत घालावे. चाकवत भाजी निवडून चांगली धुवून चीरून घ्या. नंतर त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे, चणा डाळ व हिरव्या मिरच्या चीरून घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.
चाकवत भाजी शिजल्यावर वरचे पाणी काढून बाजूला ठेवा व भाजी रवीने चांगली घोटून घ्या. नंतर ताकात थोडेसे पाणी घालून त्यामध्ये बेसन चांगले मिक्स करून घ्या. मग शिजलेला चाकवत, बेसन, मीठ एकत्र करून एक उकळी आणा. जर भाजी जास्त घट्ट वाटली तर अजून पाणी घाला. आपण भाजी घोटण्या आगोदर जे भाजीतील पाणी बाजूला काढले तेच पाणी वापरा.
फोडणीच्या कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, जीरे, हिंग हळद घालून छान खमंग फोडणी तयार करून भाजीवर घाला. भाजीवर फोडणी घातल्यावर लगेच झाकण ठेवा. म्हणजे भाजीला फोडणीचा चांगला सुगंध येईल.
नंतर झाकण काढून पुन्हा उकळी आणा.
गरम गरम चाकवत भाजी भाकरी बरोबर किवा चपाती बरोबर सर्व्ह करा.
टीप: अशीच चंदन बटवा, पालक, किवा चवळीची पाल्याची ताक घालून पातळ भाजी बनवता येते.