खुसखुशीत कोकणी पद्धतीने नारळाची बर्फी किवा ओल्या नारळाची वडी रेसिपी
ओल्या नारळाच्या वड्या किवा बर्फी आपण सणावाराला बनवू शकतो. ओल्या नारळाच्या वड्या महाराष्टात नारळी पोर्णिमा ह्या दिवशी अगदी आवर्जून बनवतात. नारळी पोर्णिमा किवा राखी पोर्णिमा ह्या दिवशी नारळाच्या पदार्थाचे खूप महत्व आहे.
ओल्या नारळाची बर्फी किवा नारळाच्या वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत. नारळाच्या वड्या बनवताना पांढरे खोबरे घेतला आहे. तसेच बर्फी बनवताना गाईचे दूध वापरले आहे त्यामुळे वड्या किवा बर्फी खूप टेस्टी होते व तोंडात टाकली की वीरघळते. म्हणजेच खूप सुंदर मऊ होते. गाईचे दूध हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनीट
वाढणी: 30 वड्या
साहीत्य:
2 कप ओला नारळ (खाऊन)
2 कप साखर
2 कप दूध (गाईचे)
7-8 केशर काड्या
1 टी स्पून वेलची व जायफळ पावडर
2 टे स्पून पिठीसाखर
1 टी स्पून साजूक तूप
कृती:
कढई गरम करून त्यामध्ये ओला नारळ, साखर व दूध घालून मध्यम विस्तवावर मिश्रण आटवायला ठेवा. मिश्रण पातळ झालेकी त्यामध्ये केशर घाला म्हणजे छान रंग येईल. मधून मधून मिश्रण सारखे हलवत रहा. नारळाचे मिश्रण घट्ट व्हायला आले की त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
मिश्रण चांगले घट्ट झालेकी म्हणजे बाजूनी सुटायला लागलेकी त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या.
एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून घ्या. मग त्यामध्ये आटवलेले मिश्रण ओतून एक सारखे पसरवून घ्या. एका स्टीलच्या वाटीला बाहेरील बाजूनी खालच्या बाजूला तूप लावून प्लेटवर मिश्रण चांगले थापून घ्या मग प्लेट बाजूला थंड करायला ठेवा. थोडे कोमट असताना वड्या कापून घ्या.
नारळाच्या वड्या किवा बर्फी थंड झाल्यावर स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.
नारळाच्या वड्या किवा बर्फी एकदम मस्त बनवण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स:
नारळ व साखर ह्याचे माप घेतांना जेव्हडा नारळ घेणार तो कपा मध्ये दाबून भरून घ्या व तेव्हड्याच प्रमाणात साखर घ्या.
नारळ खोवताना फक्त वरचे वरचे पांढरे खोबरे घ्या. मिश्रण सतत हलवत रहा. म्हणजे बुडाला लागणार नाही.
गाईचे दूध घातल्यामुळे वड्या छान मऊ सूत होतात. तोंडात टाकल्या की विरघळतात.
नारळाचे मिश्रण घट्ट झालेकी पिठी साखर घाला म्हणजे वड्या छान खुटखुटीत होतात.
जर आपल्याला ह्या वड्या बनवतांना बदल करायचा असेल तर दुधा आयवजी खवा किवा कंडेन्स मिल्क वापरू शकता.
केशर व वेलचीपूड आयवजी गुलाबी रंग व रोझ इसेन्स वापरू शकता. किवा टोमॅटो प्यूरी सुद्धा घालून छान आंबट गोड वड्या बनवू शकता.
The video in Marathi of this Burfi Recipe can be seen on our YouTube Channel- Tasty Naral Chi Vadi