टूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक कुकरमध्ये एगलेस व ऑइललेस बनवा रेसिपी
टूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक बनवतांना अंडी वापरली नाही तसेच तेल किंवा बटर किवा डालडा सुद्धा वापरले नाही केक बनवतांना ओव्हन किंवा माइक्रोवेव किंवा ओटीजी सुद्धा सुद्धा वापरला नाही.
टूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक बनवायला अगदी सोपा आहे. तसेच ह्याची टेस्ट सुद्धा निराळी आहे. केक बनवतांना मैदा, मिल्क पाउडर, बेकिंग पाउडर चाळून घेवून त्यामध्ये दूध व व्हनीला एसेन्स वापरले आहे. ज्यांना अंडे चालत नाही त्यांनी अश्या प्रकारचा केक जरूर बनवावा. ज्यांच्या कडे ओव्हन नाही त्यांना कुकरमध्ये अगदी बेकरी स्टाईल घरी बनवता येतो.
टूटी फ्रूटी मिल्क पाउडर केक आपण नाश्त्याला किवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. तसेच मुलांना शाळेत जातांना छोट्या सुट्टी साठी डब्यात द्यायला पण मस्त आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
बेकिंग वेळ: 40 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 कप मैदा
1 कप मिल्क पाउडर
1 कप दूध
1 कप साखर
2 टी स्पून व्हनीला एसेन्
2 चिमुट मीठ
1 टी स्पून बेकिंग पाउडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा
1/2 कप चेरी किवा टूटी फ्रूटी
कृती: साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैदा, मिल्क पाउडर, पिठी साखर, बेकिंग पाउडर, बेकिंग सोडा व मीठ चाळनीने 2 वेळा चाळून घ्या.
मग चाळलेल्या मैदयामध्ये व्हनीला एसेन्स, दूध घालून चांगले फेसून घ्या. मिश्रण फेसण्यासाठी हँड मिक्सर वापरले तरी चालेल. जर मिश्रण घट्ट वाटले तर अजून थोडे दूध वापरा. मग त्यामध्ये चेरी घाला. खोलगट भांड्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये मिश्रण ओता.
प्रेशर कुकर गरम करायला ठेवा. कुकर गरम झालाकी त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर मिश्रणाचे भांडे ठेवा. कुकरच्या झाकणाची शिटी व रिंग काढून कुकुरचे झाकण लावा. मग मंद विसत्वावर 40 मिनिट केक बेक करून घ्या.
गरम गरम किंवा थंड झाल्यावर टूटी फ्रूटी मिल्क केक चहा बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this cake recipe can be seen here – Tuti Fruity Milk Cake in Pressure Cooker