महाराष्ट्रियन स्टाईल मकर संक्रांत तीळ खजूर लाडू रेसिपी
थंडीच्या दिवसात तीळ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावाह आहेत. तीळच्या सेवनाने आपल्या शरीरास शक्ति व पोषण मिळते. तीळ चावून खाल्यास आपल्या दाताचे आरोग्य उत्तम रहाते. मुलांना तीळचे लाडू रोज खायला दिल्यास मुले धष्ट पुष्ट बनतात. नारळ सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावह आहे.
खजूर हे पौस्टीक शक्ति वर्धक व धातू वृद्धी करतात. खजुरात जीवनस्त्व “A” “B” व “C” भरपूर प्रमाणात आहे. खजुरात लोह तांबे फॉस्फरस कैलशियम आहे “A” जीवनसत्व मुळे आवयवांचा चांगला विकास होतो “B” मुळे हृदय शरीर व इंद्रीय सुदृढ राहतात. पचन शक्ती वाढते.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 25-30 लाडू बनतात
साहित्य:
300 ग्राम खजूर
1 कप तीळ (साधे)
1/4 कप काजू
1/4 कप डेसिकेटेड कोकानट
1 टी स्पून वेलची पावडर
1 टी स्पून साजूक तूप
सजावटी साठी:
2 टे स्पून डेसिकेटेड कोकानट
2 टे स्पून तीळ (पॉलिशचे)
कृती:
खजुर चांगला धुवून पुसून घ्या. मग त्याच्या बीया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. काजूचे बारीक तुकडे करून घ्या.
एका कढईमध्ये तीळ छान खमंग भाजून घ्या तीळ भाजताना मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. तीळ चांगले गरम झालेकी तडतडल्याचा आवाज येईल मग विस्तव बंद करा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर ग्राईड करून घ्या.
कढमध्ये तूप गरम करून त्यामध्ये खजूर घालून थोडेसे परतून घ्या. खजूर गरम झालेकी मऊ होतील. खजूर मऊ झालेकी विस्तव बंद करा. मिक्सरच्या भांड्यात खजूर थोडे जाडसर ग्राईड करून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात खजूर, तीळची पावडर, वेलची पावडर घालून थोडेसे ग्राईंड करा मग मिश्रण परातीत काढून घ्या. त्यामध्ये डेसिकेटेड कोकानट व काजूचे तुकडे घालून परत चांगले मळून घ्या. मळलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घेवून डेसिकेटेड कोकानट वर व तीळवर फिरवून बाजूला ठेवा. अश्या प्रकारे सर्व लाडू बनवून घ्या.
तीळ खजूर लाडू बनवून झालेकी स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.
The video of this Laddu recipe can be seen here – Maharashtrian Style Til Khajur Laddu