महाराष्ट्रियन पद्धतीने मकर संक्रांत हेल्दी तीळ हनी लाडू रेसिपी
तीळ हनी लाडू हा एक मकरसंक्रांत साठी लाडूचा नवीन प्रकार आहे. तीळ हनी लाडू बनवतांना गूळ किंवा साखरेचा पाक बनवायची गरज नाही. साखर किंवा गूळ वापरण्या आयवजी मध वापरले आहे. तीळ हनी लाडू बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत.
थंडीच्या दिवसात तीळ खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हीतावह आहे. तिळाच्या सेवनाने आपल्या शरीराला उष्णता मिळते. सकाळी लवकर उठून तीळ खाणे आपल्याला हितकारक आहे. तसेच मधास श्रेष्ठ प्रतीचा खाद्य पदार्थ समजले आहे. मधाच्या सेवनाने मनुष्य निरोगी, बलवान, आणि दीर्घायुषी बनतो.
बनवण्यासाठी वेळ; 25 मिनिट
वाढणी: 15-20 मध्यम लाडू
साहित्य:
1कप तीळ
1/3 कप बदाम
1 टी स्पून वेलची पावडर
1 टी स्पून वनीला एसेन्स
1/2 कप मध
1 टी स्पून लिंबाची साले (किसून)
एक चिमुट मीठ
कृती
कढई गरम करून घ्या त्यामध्ये तीळ घालून मंद विस्तवावर खमंग भाजून घ्या. मग थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. बदाम मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्या. एक ताजे लिंबू घेवून त्याची साले किसणींनी किसून घ्या.
एका मध्यम आकाराच्या बाउल मध्ये ग्राईड केलेला तीळ कूट, बदाम, लिंबू कीस, एक चिमुट मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये मध घालून चांगले मिक्स करून घ्या. म्हणजेच मळून घ्या. मळल्यावर त्याचे छोटे छोटे लाडू बनवून घ्या. एक लाडू घेवून पांढर्या तीळामध्ये रोल करून घ्या. अश्या प्रकारे सर्व लाडू बनवून घ्या.
लाडू बनवून झाले की स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. तीळ हनी लाडू चवीला मस्त लागतात.
The video in Marathi can be seen here – Til Honey Laddu for Makar Sankranti