लिंबाचे आंबटगोड लोणचे 20 मिनिटात कुकरमध्ये असे बनवा
डिसेंबर जानेवारी महिन्यात बाजारात लिंबू स्वस्त व मस्त मिळतात. तेव्हा आपण लिंबाचे लोणचे गोड किंवा तिखट, रसलिंबू , सुधारस बनवून ठेवू शकतो. कोकणी पद्धत झटपट टिकाऊ लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवायला अगदी सोपे आहे. तसेच झटपट होणारे आहे. लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवताना तेल आजिबात वापरले नाही.
लिंबाचे आंबटगोड लोणचे जेवतांना असले तर जेवण जास्तच जाते व रुचकर सुद्धा लागते. मुलांना चपाती बरोबर लिंबाचे लोणचे खायला फार आवडते तसेच शाळेत जातांना मुलांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. लिंबाचे आंबट गोड लोणचे बनवतांना साखर, काश्मिरी लाल मिरची पावडर, काळे मीठ व जिरे पावडर वापरली आहे. त्यामुळे लोणच्याला छान टेस्ट येते.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 1 मध्यम आकाराची बरणी भरते
साहित्य:
10 लिंबू
1 1/4 कप साखर
1 टे स्पून जिरे (बारीक करून)
2 टे स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
2 टी स्पून काळे मीठ
1 टी स्पून मीठ (नेहमीचे)
कृती:
प्रथम लिंबू धुवून पुसून घ्या. मग एका लिंबाच्या 8 फोडी कापून घ्या. लिंबातील बिया काढून टाका. जिरे कुठून घ्या. काळे मीठ थोडे कुटून घ्या.
एका कुकरच्या मोठ्या भांड्यात चिरलेली लिंबू घेवून त्यामध्ये साखर, काश्मिरी लाल मिरची पावडर, काळे मीठ, आपले नेहमीचे मीठ, कुटलेले जिरे घालून मिक्स करून घ्या.
कुकर विस्तवावर गरम करायला ठेवा व त्यामध्ये भांडे ठेवून त्यावर झाकण ठेवा. कुकरचे झाकण लावून मध्यम विस्तवावर 8-10 शिट्या काढा. कुकर थंड करायला ठेवा. कुकर थंड झाल्यावर भांडे बाहेर काढून घ्या. भांड्यातील फक्त शिजलेली लिंब काचेच्या बाउलमध्ये काढून घेवून बाजूला ठेवा.
भांड्यातील राहीलेले मिश्रण एका कढईमद्धे काढून घ्या. मिश्रण पातळ असेल तर ते आपण थोडे आटवून घ्यायचे साधारणपणे मंद विस्तवावर 8-10 मिनिट आटवावे. असे केल्याने आपले लोणचे थोडे दिवस छान टिकून राहते.
मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यामध्ये शिजलेली लिंबू घालून परत 1-2 मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्यावे. जास्त शिजवायचे नाही नाहीतर लिंबाच्या सालीचा कडवट पणा उतरून लोणचे कडवट होईल. मग विस्तव बंद करून काचेच्या बाउल मध्ये लिंबाचे काढून घ्या. स्टीलच्या भांड्यात जास्त वेळ ठेवू नये.
लिंबाचे आंबट गोड लोणचे थंड झाल्यावर काचेच्या बरणी मध्ये काढून घ्या.
The Marathi language video of the Instant Pickle recipe can be seen here – Instant without oil Sweet and Sour Pickle
हे लोणचे वर्षभर नाही टिकणार का? फ्रिज ची गरज आहे का?
नाही वर्षभर टिकू शकत नाही.