3 प्रकारच्या झटपट सोप्या यम्मी टेस्टी हेल्दी गाजराच्या कोशिंबीर (सॅलड)
आपण बाजारात भाजी आणायला गेलोकी आपल्याला छान ताजी केशरी गाजर दिसली की आपल्याला गाजर खरेदी करायचा मोह होतो. मग आपण घरी गाजर आणली की त्याचा हलवा, सलाड किंवा कोशंबीर, सूप पराठे बनवतो. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी अश्या प्रकारची गाजराची कोशंबीर जरूर सेवन करावी.
महाराष्ट्रियन जेवणात कोशिंबीर ही हवीच त्या शिवाय आपला स्वयंपाक पूर्ण कसा होणार. जेवणात कोशिंबीर असली की जेवणाला छान सीएचडब्ल्यू येते. आपण नानाविध प्रकारच्या कोशिंबीर बनवतो अश्याच काही गाजराच्या निराळ्या पद्धतीने कोशिंबीर कश्या बनवायच्या ते आपण बघू या.
गाजर हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गाजर हे शक्तीचे भंडार आहे. गाजर हे मधुर, तीक्ष्ण, कडूसर, गरम, हलके, जुलाबात गुणकारी, कफ व वायु दूर करणारे आहे. गाजरात जीवनस्तव “A” आहे. तसेच प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, गंधक, व स्टार्च आहे. गाजराच्या सेवनाने डोळ्यांना खूप लाभ होतो.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
गाजर कोशिंबीर प्रकार – 1
साहीत्य:
250 ग्राम ताजी लाल गाजरे
2 मोठे टोमॅटो, 1 मध्यम कांदा
2 टे स्पून शेंगदाणा कूट
1/4 कप ओला नारळ (खाऊन)
1/4 कप कोथिंबीर (चिरून)
1 टे स्पून लिंबुरस
मीठ व साखर चवीने
फोडणी करीता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1/4 टी स्पून हिंग
2 हिरव्या मिरच्या (तुकडे करून)
कृती:
प्रथम गाजर धुवून पुसून घ्या. मग त्याची साले काढून किसून घ्या. टोमॅटो चिरून (बिया काढून) घ्या. कांदा बारीक चिरून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये किसलेली गाजर, चिरलेला टोमॅटो व कांदा घेवून मिस्क करून घ्या. मग त्यामध्ये शेंगदाणा कूट, ओला नारळ, कोथिंबीर, लिंबूरस, मीठ व साखर घालून मिक्स करून घ्या.
फोडणीच्या कढई गरम करून त्यामध्ये तेल घालून गरम झाल्यावर मोहरी, हिंग व हिरव्या मिरच्या तुकडे घालून थोडेसे गरम करून मग खमंग फोडणी गाजराच्या कोशिंबीरवर घालून चांगले एकत्र करून घ्या. गाजराची कोशिंबीर सर्व्ह करतांना वरतून ओला नारळ व कोथिंबीर घालून सजवा.
गाजर कोशिंबीर प्रकार – 2
गाजर कोशिंबीर प्रकार – 2 ह्यामध्ये लिंबुरस आयवजी दही व तेला आयवजी तूप वापरले आहे.
साहीत्य:
250 ग्राम ताजी लाल गाजरे
2 हिरव्या मिरच्या 1 टी स्पून मोहरी (कुटून)
1 कप दही (घट्ट)
1/4 कप कोथंबीर (चिरून)
मीठ व साखर चवीने
फोडणी करीता:
1 टे स्पून साजूक तूप
1 टी जिरे
1/4 टी स्पून हिंग
कृती:
प्रथम गाजर धुवून पुसून घ्या. मग त्याची साले काढून किसून घ्या.हिरवी मिरची व मोहरी कुठून घ्या. कोथंबीर धुवून चिरून घ्या.
एका बाउलमध्ये किसलेली गाजर घेवून त्यामध्ये कुटलेली हिरवी मिरची व मोहरी, कोथंबीर चिरलेली, मीठ व साखर घालून मिक्स करून घ्या.
फोडणीची वाटी गरम करून त्यामध्ये साजूक तूप गरम करून घ्या. मग त्यामध्ये जिरे व हिंग घालून मग खमंग फोडणी गाजराच्या कोशिंबीरवर घालून चांगले एकत्र करून घ्या.
अश्या प्रकारची कोशिंबीरवर नुसती खायला सुद्धा मस्त लागते.
गाजर कोशिंबीर अथवा सलाड प्रकार – 3
गाजर कोशिंबीर प्रकार – 3 बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. ह्यामध्ये दाण्याचा कूट किंवा फोडणी घालायची गरज नाही.
साहीत्य:
250 ग्राम केशरी अथवा लाल गाजर
6-7 खजूर (बिया काढून)
1/2 कप काळी द्राक्ष
1 टे स्पून लिंबूरस
1 टी स्पून मिरे पावडर
मीठ व साखर चवीने
कृती:
प्रथम गाजर धुवून पुसून घ्या. मग त्याची साले काढून किसून घ्या.खजूर धुवून बिया काढून चिरून घ्या. काळी द्राक्ष चिरून घ्या.
एका बाउलमध्ये किसलेली गाजर, चिरलेला खजूर व काळी द्राक्षे घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये मिरे पावडर, लिंबुरस, मीठ व साखर घालून मिक्स करून घ्या. थंड करून हे सलाड सर्व्ह करा.
गाजर, द्राक्षे व खजूरचे सलाड टेस्टी लागते करून बघा.
The Marathi video of this Koshimbir Recipe can be seen here – 3 Kinds of Gajar ka Salad