दलिया लाडू/ फुटाणा डाळ लाडू रेसीपी
आपण नेहमी बेसन लाडू रवा लाडू बुंदीचे लाडू अथवा नानाप्रकारचे लाडू बनवतो. द्लिया म्हणजेच फुटाणा डाळीच्या पिठाचे लाडू होय. फुटाणा डाळीच्या पिठाचे लाडू हे चवीला खूप मस्त टेस्टी लागतात. आपण सणवाराला किंवा जेवणा नंतर डेझर्ट महणून सुद्धा बनवू शकतो.
दलिया लाडू बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत तसेच छान मऊ लुसलुशीत लागतात. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला मस्त आहेत.
दलियाला भाजकी डाळ, फुटाणा डाळ किंवा पंढरपूरी डाळ सुद्धा म्हणतात.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 8 लाडू बनतात
साहीत्य:
1 कप फुटाणा डाळ/ भाजकी डाळ/ पंढरपूरी डाळ (दलिया)
½ कप साखर
2 टे स्पून तूप (अजून थोडे लागले तर 2 चमचे)
1 टी स्पून वेलचीपूड
थोडे ड्रायफ्रूट (बदाम, काजू पिस्ते तुकडे करून)
कृती:
प्रथम ड्रायफ्रूटचे तुकडे करून घ्या. पंढरपूरी डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये वाटलेल्या फुटाणा डाळीचे पीठ छान मंद विस्तवावर 4-5 मिनिट भाजून घ्या. पीठ भाजून झाल्यावर त्यामध्ये वेलची पूड, ड्रायफ्रूट व पिठीसाखर घालून मिक्स करून 2 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या.
नंतर विस्तव बंद करून कढई खाली उतरून थोडे थंड करायला ठेवा. मिश्रण कोमट झालेकी त्यामध्ये थोडे थोडे मिश्रण घेवून थोडेसे तूप घालून चांगले मळून घेवून लाडू वळून घ्या. अश्या प्रकारे सर्व लाडू वाळवून घ्या.
The Marathi language video of this Ladoo can be seen here – Sweet and Tasty Dalia or Phutana Dal Ladoo