ब्रेडचे झटपट गुलाबजाम अगदी हलवाईच्या मिठाई सारखे मऊ लुसलुशीत रेसीपी
गुलाबजाम म्हंटले की अगदी तोंडाला पाणी सुटते. लहान मुलांपासून ते मोठ्या परंत सर्वांना गुलाबजाम ही स्वीट डिश आवडते. गुलाबजाम आपण सणावाराला किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो. किंवा वाढदिवसाच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. आपण ब्रेड वापरुन सुद्धा गुलाबजाम बनवू शकतो. घरच्या घरी आपण अगदी हलवाई सारखे म्हणजे मिठाईच्या दुकाना सारखे मऊ मुलायम गुलाबजाम बनवता येतात.
घरी अचानक पाहुणे आले असतील किंवा येणार असतील तर आपल्या घरी खवा नसतांना सुद्धा अगदी खव्याच्या टेस्ट सारखे ब्रेड वापरुन गुलाबजाम बनवता येतात. ब्रेडचे गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत. तसेच ब्रेड गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: १० बनतात
साहीत्य:
पाक बनवण्यासाठी:
1 कप साखर
2 कप पाणी
1 टी स्पून वेलची पावडर
गुलाबजाम बनवण्यासाठी:
6 मोठे ब्रेड स्लाईस
1/2 कप दूध
8-10 काजू तुकडे
तूप किंवा तेल गुलाबजाम तळण्यासाठी
बदाम व पिस्ते सजवटी करीता
कृती:
पाक बनवण्यासाठी: एका जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी मिस्क करून माध्यम विस्तवावर पाक बनवायला ठेवा. साधारण पणे पाक बनवायला 5-7 मिनिट लागतील. पाक फार पातळ किंवा फार घट्ट बवायचा नाही अगदी थोडासा चिकट झाला पाहीजे. मग त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून विस्तव बंद करून भांडे झाकून ठेवा.
गुलाबजाम बनवण्यासाठी: प्रथम ब्रेडच्या चारी बाजूंनी कडा कापून बाजूला ठेवा. ब्रेडच्या कडा टाकून देवू नका त्याडब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे आपल्याला कटलेट किंवा कबाब बनवतांना वापरता येतील.
ब्रेडच्या कडा कापल्यावर एका बाउलमध्ये ब्रेडचे तुकडे करून घेवून त्याचा चुरा करून घ्या. मग त्यामध्ये थोडे थोडे दूध घालून आपण जसे पीठ मळतो तसे मळावे. पीठ फार घट्ट किंवा सैल मळू नका. आपण नेहमी मळतो तसे मळा. मग झाकून 5 मिनिट बाजूला ठेवा. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे एक सारखे गोळे बनवा. एक गोळा बनवला की त्यामध्ये एक काजू खोचून परत गोळा चांगला बंद करा. अश्या प्रकारे सर्व गोळे बनवून घ्या. गोळे वळताना हाताला थोडेसे तेल लावून मळले तरी चालेले.
कढईमध्ये तूप अथवा तेल गरम करून घेवून गोळे छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या.
साखरेचा पाक बनवलेल्या भांड्यात तळलेले गुलाबजाम घालून झाकण ठेवून मंद विस्तवावर 5 मिनिट गरम करून घ्या. मग थंड झाल्यावर बाउलमध्ये काढून घेवून त्यावर बदाम व पिस्ते चीरून घाला व मग सर्व्ह करा.
The video in Marathi of this Gulab Jamun recipe can be seen here – Tasty and Quick to Make Bread Gulab Jamun