3 प्रकारच्या होम मेड एस्प्रेसो हनी/ कॅरॅमल/ सिनेमन कॉफी (बरिस्ता कॉफी स्टाईल) मशिन शिवाय
एस्प्रेसो कॉफी आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. ह्या रेसिपी मध्ये तीन प्रकारचे फ्लेव्हर आहेत. एस्प्रेसो कॉफी बनवताना प्रथम एका बाउलमध्ये कॉफी व साखर मिक्स करून घ्या.मग त्यामध्ये दोन टे स्पून गरम पाणी किंवा गरम दूध घेवून चमच्यानी चांगले फेटून घ्या. किंवा हँड मिक्सर वापरला तरी चालेल म्हणजे त्याला चांगला फेस येईल. मग ग्लास मध्ये हे मिश्रण घालून त्यावर गरम दूध (मलई युक्त) वरतून ओता म्हणजे आपोआप वरती छान फेस येईल. जर आपल्याला थंड कॉफी बनवायची असेल तर दूध (मलई युक्त) मिक्सरच्या जार मध्ये ब्लेण्ड करून घ्या. मग वरतून आपल्याला जो पाहिजे तो फ्लेव्हर द्या. मलई युक्त दूध घेवून ब्लेण्ड केलेकी छान फेस येतो मग व्हिप क्रीम नसेल तरी चालेल.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
एस्प्रेसो हनी कोल्ड कॉफी साहीत्य:
2 कप दूध (मलई युक्त) , 2 टे स्पून हनी (मध), 2 टी स्पून साखर, 1 टे स्पून ब्रू कॉफी पावडर, 1-2 थेंब वनीला एसेन्स, 8-10 आईस क्युब
कृती: दूध गरम करून गार करून घ्या. कॉफी पावडर, साखर व 2 टे स्पून गरम पाणी किंवा दूध चांगले फेटून घ्या. मग दूध व वनीला एसेन्स ब्लेण्ड करून घ्या. ब्लेण्ड करताना मिक्सर 10 सेकंद चालू करून बंद करा असे 5-6 वेळा करा म्हणजे छान झाक येईल. दोन मग किंवा ग्लास घेवून त्यामध्ये ब्रू कॉफीचे मिश्रण घालून वरतून थोडे दूध, आईस क्युब व परत दूध घालून हनी व कॉफी किंवा कोको पावडर घालून सजवून थंड सर्व्ह करा.
एस्प्रेसो कॅरॅमल हॉट कॉफी साहित्य:
2 कप दूध, 1 टे ब्रू कॉफी पावडर, 2 टी स्पून साखर 2 टे स्पून कॅरॅमल (आधी बनवून घ्या. पण फार घट्ट नको थोडेसे पातळ बनवा)
कृती:
दूध चांगले गरम करून घ्या. दूध, साखर व कॉफी फेटून घ्या (वरील प्रमाणे), दोन मग किंवा ग्लास घेवून ग्लासच्या आतील बाजूस वरतून चमच्यानी थोडे थोडे कॅरॅमल सोडा म्हणजे ते आतील बाजूस हळूहळू खाली येतील. मग त्यामध्ये गरम गरम दूध हळूहळू वरतून ओता. वरच्या बाजूस चांगला फेस येईल. मग बाकीचे राहीलेले कॅरॅमल घालून सजवा. गरम गरम एस्प्रेसो कॅरॅमल हॉट कॉफी सर्व्ह करा
एस्प्रेसो हॉट / कोल्ड सिनेमन कॉफी साहित्य:
2 कप दूध, 1 टे स्पून ब्रू कॉफी पावडर, 2 टी स्पून साखर, 2 टी स्पून दालचिनी पावडर
कृती: सर्व कृती वरील प्रमाणे फक्त ब्लेण्ड करतांना दालचिनी पावडर टाका. तसेच दालचिनी पावडरने गर्निश करा. ही कॉफी थंडीमध्ये हॉट कॉफी म्हणून बनवता येते व गरमीमध्ये कोल्ड कॉफी म्हणून बनवता येते. तसेच दुधा आयवजी पाणी सुद्धा वापरुन बनवता येते.
टीप: अश्या प्रकारच्या कॉफी बरिस्ता कॉफी मध्ये वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये बनवतात. बरिस्ता कॉफी ही एक बाहेरील देशातली कॉफी चेन आहे आता सध्या खूप लोकप्रीय आहे. व ते खूप सुंदर गर्निश करतात.
The Marathi language video of this Coffee making method can be seen here – How to Make Espresso Honey, Caramel and Cinnamon Coffee at Home Without Machine