मुलांना भूक लागली झटपट दोन प्रकारचे हेल्दि नाश्ता बनवा अगदी आवडीने खातील रेसीपी
मुले शाळेतून घरी आली किंवा बाहेर खेळून आली की त्यांना भूक लागते व त्यांना पटकन काही तरी त्यांच्या आवडीचे खायचे असते. मग उगाच काही तरी सटर फटर खाण्या पेक्षा अश्या प्रकारचा खाऊ त्यांना दिला तर मुले खुश व आपण सुद्धा खुश की मुलांनी पौस्टिक खाल्ले म्हणून.
तर आता आपण बघू या की हे झटपट हेल्दि नाश्ता कसा बनवायचा. अश्या प्रकारचे पँन केक कसे बनवायचे. ह्या विडियोमध्ये आपण दोन प्रकारचे पँन केक बनवणार आहोत. एक अंडे वापरुन वनीला पँन केक व दूसरा ऑरेंज म्हणजेच संत्री वापरुन पँन केक. आपण वेगवेगळी फळे वापरुन अश्या प्रकारचे पँन केक बनवू शकतो. तसेच आपण सकाळी ब्रेक फास्टला किंवा दुपारी चहा बरोबर किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा बनवता येतात. हे पँन केक बनवण्यासाठी सोपे व झटपट व अगदी मुलायम बनतात.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
वनीला पँन केक (अंड्याचा)
साहीत्य:
2 कप गव्हाचे पीठ
1 कप मैदा
2 अंडी (फेटून)
1 कप दूध
3 टे स्पून साखर
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा
मीठ चवीने
तेल किंवा बटर फ्राय करण्यासाठी
ऑरेंज पँन केक
साहीत्य:
2 कप गव्हाचे पीठ
1 कप मैदा
2 संत्री (जूस) 1 संत्रे (तुकडे करून)
3 टे स्पून साखर
1 कप बटर मिल्क
1 टी स्पून बेकिंग पावडर
1/2 टी स्पून बेकिंग सोडा
मीठ चवीने
तेल किंवा बटर फ्राय करण्यासाठी
कृती: वनीला पँन केक (अंड्याचा):
प्रथम अंडी फेटून घ्या. एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, साखर, दूध मीठ, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करून घ्या,
फेटलेले अंडे व वनीला एसेन्स घालून परत चांगले एक जीव करून घ्या. मिश्रण आपण डोशाच्या पीठासारखे बनवायचे आहे. जरूर असेल तर थोडे पाणी वापरा. मग मिश्रण 5 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
कृती: ऑरेंज पँन केक:
प्रथम दोन संत्री सोलून त्याचा ज्यूस काढून घ्या. अजून एक संत्रे सोलून त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, बटर मिल्क (जर तुमच्याकडे बटरमिल्क नसेल तर एक कप दुधामध्ये 2-3 थेंब लिंबुरस घालून मिक्स करा), ऑरेंज ज्यूस, ऑरेंजचे तुकडे, साखर, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करून घ्या. जरूर असेलतर पाणी वापरा. मिश्रण आपण डोश्याचे पीठ जसे करतो तसे बनवायचे. बनवलेले मिश्रण 5 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
पँन केक कसे बनवायचे:
नॉन – स्टीक पॅन गरम करायला ठेवा. पॅन वर तेल किंवा बटर थोडेसे लावा व एक डाव मिश्रण घालून थोडेसे पसरून घ्या पण जास्त पातळ पसरायचे नाही थोडे जाडसरच पसरायचे म्हणजे ते छान फुगून येईल व पॅन केक मस्त मऊ होईल. बाजूंनी परत थोडेसे बटर घाला व दोन्ही बाजूनी पॅन केक भाजून घ्या. अश्या प्रकारे दोन्ही प्रकारचे पॅन केक बनवून घ्या.
गरम गरम वनीला पँन केक व ऑरेंज पँन केक सर्व्ह करा.
The Marathi language video of this Healthy and Nutritious Breakfast for Children can be seen here – Healthy Nashta for Hungry Children