घरच्या घरी बनवा गुडी पाडव्यासाठी गाठी
गुडी पाडवा हा महाराष्ट्रातील खूप महत्वाचा सण आहे. ह्या दिवसा पासून मराठी लोकांचे नवीन वर्ष सुरू होते. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो. महाराष्टमध्ये घरो घरी दारासमोर गुडी उभारतात व त्याला साखरेच्या गाठीचा हार घालतात. लहान मुलांना पण गाठीचा हार घालतात.
गुडी उभरताना ज्या गाठीचा हार घालतात तो आपण घरी कसा बवायचा ते बघू या. बनवायला अगदी सोपा आहे व झटपट होणारा आहे आपण रंग वापरुन सुद्धा बनवू शकतो. त्यामुळे आकर्षक दिसतो.
साहित्य
1 1/2 कप साखर
1/2 कप पाणी
1-2 थेंब रोज एसेन्स किंवा 1 टी स्पून वेलची पावडर
2 थेंब पिवळा रंग
1 टी स्पून तूप
कृती:
प्रथम आपप गाठी बनवण्यासाठी छोट्या छोट्या ताटल्या घेणार असाल तर त्याला तेल किंवा तूप लावा किंवा जर ताटात करणार असाल तर ताटाला तूप लावा. किंवा आपण सिलिकॉनचे मोल्ड वापरले तरी चालेल. मग त्यामध्ये जाड दोरा U शेप मध्ये ठेवा.
एका जाड बुडाच्या कढईमद्धे साखर व पाणी घेवून मंद विस्तवावर पाक करायला ठेवा. पाक बनवतांना दोन तारी बनवा म्हणजे थोडा चिकट झाला पाहिजे.
पाक बनवून झाल्यावर त्यामध्ये साजूक तूप, पिवळा रंग व रोज एसेन्स किंवा वेलची पावडर मिक्स करून घ्या. पाक झालकी नाही हे बघण्यासाठी एका स्टीलच्या प्लेटवर 2-3 थेंब टाका व दोन बोटानमध्ये पाकाची तार आली पाहिजे असे असेल तर लगेच विस्तव बंद करा. गाठी घालताना गरम गरमच घालायच्या आहेत म्हणजे छान होतात.
कढई खाली उतरवून एका टेबल स्पूनने साखरेचा पाक दोर्यावर सोडायचा थोडा जाडसर सोडायचा मध्ये मध्ये थोडे अंतर सोडा वरतून सजावटी साठी जेम्सच्या गोळ्या लावून सजवा.. 2-3 मिनिटात गाठी थंड होतील मग हळुवार पणे गाठी काढा.
आपल्या गाठी आता तयार झाल्या. आहेत की नाही बनवायला अगदी सोप्या.
The Marathi language video of this Gudi Padwa Gathi recipe can be seen here – Homemade Gudi Padwa Gathi